सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. क्रिकेटप्रेमी या स्पर्धेची चांगलीच मजा लुटत आहेत. मात्र, आयपीएलनंतर प्रेक्षकांना मोठमोठ्या स्पर्धांचा आनंद लुटता येणार आहे. त्यातीलच एक मोठी स्पर्धा म्हणजे आयसीसी वनडे विश्वचषक 2023 होय. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान भारतात होणार आहे. आता या स्पर्धेविषयी मोठी बातमी समोर येत आहे. एका नामांकित क्रिकेट वेबसाईटनुसार, विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्याने होणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
एका क्रिकेट वेबसाईटनुसार, या गोष्टीची पुष्टी झाली आहे की, पाकिस्तान विश्वचषकात भारताचा दौरा करण्यासाठी सहमत झाला आहे. मात्र, असेही वृत्त समोर येत आहे की, पाकिस्तान संघाला अहमदाबादमध्ये साखळी सामना खेळायचा नाहीये. अस्थायी वेळापत्रकानुसार पाकिस्तान संघ त्यांचे सामने अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरू येथे खेळेल.
मोहाली-नागपूरमध्ये होणार नाहीत सामने
अहमदाबाद, चेन्नई, बेंगलोर आणि हैदराबादव्यतिरिक्त कोलकाता, दिल्ली, इंदोर, धरमशाला, गुवाहाटी, राजकोट, रायपूर आणि मुंबईत वनेड विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, मोहाली आणि नागपूरला यजमान शहरांच्या यादीतून बाहेर काढले आहे. 2011च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवणाऱ्या वानखेडे स्टेडिअममध्ये यावेळी अंतिम एक उपांत्य सामना आयोजित करण्याची संधी मिळू शकते.
आठ संघांनी केलंय क्वालिफाय
यावेळी विश्वचषकात एकूण 10 संघ खेळणार असून त्यांच्यात 48 सामने पार पडणार आहेत. 10 संघांपैकी भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी आधीच या स्पर्धेत एन्ट्री घेतली आहे. तसेच, आता उर्वरित 2 संघांचा निर्णय झिम्बाब्वेमध्ये जून-जुलै महिन्यात होणाऱ्या क्वालिफाय स्पर्धेमार्फत होईल. क्वालिफाय स्पर्धेत वेस्ट इंडिज, श्रीलंक, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि यजमान झिम्बाब्वे देशांचा समावेश आहे.
सन 2019च्या विश्वचषकाप्रमाणे यावेळीही सामने राऊंड-रॉबिन प्रकारात खेळले जातील. जिथे प्रत्येक संघ विरोधी संघाविरुद्ध एक-एक वेळा खेळेल. म्हणजेच साखळी फेरीचा शेवट झाल्यानंतर सर्व संघांनी प्रत्येकी 9 सामने खेळले असतील. साखळी फेरीत अव्वल 4 संघ उपांत्य सामन्यांमध्ये आमने-सामने असतील. हे वृत्त क्रिकबझ या क्रिकेट वेबसाईटने दिले आहे. (odi world cup 2023 india vs pakistan match on 15 october narendra modia stadium ahmedabad know all here)
वृत्तांनुसार, समोर आलेली विश्वचषक 2023विषयी महत्त्वाची माहिती
-पहिला सामना- न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, (5 ऑक्टोबर, अहमदाबाद)
-भारताचा पहिला सामना- विरुद्ध ऑस्ट्रेलिया
-भारत विरुद्ध पाकिस्तान सामना (15 ऑक्टोबर, अहमदाबाद)
-अंतिम सामना- (19 नोव्हेंबर, अहमदाबाद)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदानावर कार्तिकसोबत घडलेल्या प्रकाराबाबत RCB कोचचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘त्याला उलटी…’
विराट ते धोनी, ‘हे’ खेळाडू महिला असते, तर कसे दिसले असते? नावासहित पाहा त्यांचे AI फोटो