भारतीय संघाने शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात पाकिस्तान संघाला धोबीपछाड दिला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना भारताने 7 विकेट्सने आपल्या खिशात घातला. या पराभवामुळे पाकिस्तानी अभिनेत्री खूपच निराश झाली आहे. या अभिनेत्रीने आता बांगलादेशच्या खेळाडूंपुढे भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी मोठी ऑफर ठेवली आहे. चला तर, ही काय ऑफर आहे जाणून घेऊयात…
कोण आहे अभिनेत्री आणि तिची ऑफर?
खरं तर, भारतीय (Team India) संघाला आपला चौथा सामना बांगलादेशविरुद्ध गुरुवारी (दि. 19 ऑक्टोबर) पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम (Maharashtra Cricket Association Stadium) येथे खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी (Sehar Shinwari) हिने तिच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून बांगलादेशच्या खेळाडूंना ऑफर दिली आहे. त्यात तिने म्हटलंय की, जर त्यांनी पुढील सामन्यात भारताला हरवलं, तर ती त्यांच्यासोबत ‘फिश डिनर डेट’वर जाईल.
पाकिस्तान भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर अभिनेत्रीने दुसऱ्या दिवशी पोस्ट करत लिहिले की, “इंशाअल्लाह, माझे बंगाली बंधू पुढील सामन्यात आमचा बदला घेतील. जर त्यांच्या संघाला भारताला हरवण्यात यश आले, तर मी ढाकाला जाईल आणि बंगाली बॉयसोबत फिश डिनर डेट करेल.”
भारताने केलीय विजयाची हॅट्रिक
भारतीय संघ विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. स्पर्धेत भारताने आपल्या अभियानाची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. चेन्नईत पार पडलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर अफगाणिस्तानला 8 विकेट्सने पराभूत केले. तसेच, तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 7 विकेट्सने पराभव केला.
विशेष म्हणजे, भारताने हे तिन्ही सामने आव्हानाचा पाठलाग करताना जिंकले आहेत. आता संघाचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध आहे. त्यानंतर भारत न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध भिडणार आहे. (odi world cup 2023 pakistani actress sehar shinwari gave fish dinner date offer to bangladeshi players know here why)
हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण






