2023 वनडे विश्वचषक स्पर्धेतील 14 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील आपले गुणांचे खाते खोलले. तर श्रीलंकेचा हा सलग तिसरा पराभव ठरला. त्यानंतर आता गुणतालिकेतील स्थिती काहीशी बदलली आहे.
https://www.instagram.com/p/Cyd34IituAZ/?igshid=MzRlODBiNWFlZA==
हा सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ कोणा तालिकेत सर्वात खालच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर होता. मात्र, विजयानंतर त्यांच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा झाली असून ते आठव्या क्रमांकावर क्रमांकावर पोहोचले आहेत. तर श्रीलंका एका स्थानाच्या नुकसानासह नवव्या क्रमांकावर गेली. सध्या इंग्लंड, अफगाणिस्तान, बांगलादेश व इंग्लंड यांनी प्रत्येकी एक विजय मिळवला असून, सरस धावगतीमुळे इतर तीन संघ ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहेत. श्रीलंका नव्या तर नेदरलँड दहाव्या स्थानी दिसून येते.
भारतीय संघ आपल्या तिन्ही सामन्यात मोठा विजय मिळवत अव्वलस्थानी विराजमान आहे. तसेच, 6 गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी, तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानी आहे. आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात दमदार प्रदर्शन केले आहे. चौथ्या स्थानी पाकिस्तान संघ असून त्यांनी तीनपैकी 2 सामने जिंकले आहेत.
दक्षिण आफ्रिकेकडे अव्वल स्थानाची संधी
मंगळवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड असा सामना खेळला जाणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत दोन दर्जेदार विजय मिळवलेल्या दक्षिण आफ्रिकेकडे काहीशा दुबळ्या नेदरलँड्सला पराभूत करण्याची चांगली संधी असेल. तसेच मोठा विजय मिळवल्यास ते भारताला मागे टाकून गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहचू शकतात.
(ODI World Cup 2023 Points Table After Australia Win Over Srilanka)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपमध्ये जायंट किलर ठरतोय मदुशंका! आजवर बाद केलेल्या फलंदाजांची यादी पाहाच
विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?