---Advertisement---

शुबमन गिलबाबत धक्कादायक ब्रेकिंग! बीसीसीआयने स्वत: दिली माहिती, लगेच वाचा

Shubman-Gill
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाला आपल्या दुसऱ्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. संघ आपल्या खेळाडूंच्या दुखापती आणि आजारपणामुळे चिंतेत आहे. आता चिंताजनक बातमी समोर येत आहे. भारताचा सलामीवीर शुबमन गिल पुढील सामन्यात खेळताना दिसणार नाहीये. शुबमन गिल चेन्नई येथेच थांबणार आहे. याची माहिती स्वत: बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

शुबमन गिल दुसऱ्या सामन्याला मुकणार
खरं तर, शुबमन गिल (Shubman Gill) हा डेंग्यूमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील भारताच्या पहिल्या सामन्याला मुकला होता. त्यानंतर आता 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही तो खेळताना दिसणार नाहीये. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर होणार आहे. या सामन्यासाठी गिलने संघासोबत प्रवासही केला नाहीये.

बीसीसीआयने दिली माहिती
बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “भारतीय संघाचा फलंदाज शुबमन गिल 9 ऑक्टोबर, 2023 रोजी संघासोबत दिल्लीला जाणार नाही. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे संघाचा पहिला सामना खेळू न शकलेला सलामीवीर 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणारा अफगाणिस्तानविरुद्ध पुढील सामना खेळू शकण्याची शक्यता नाहीये. तो चेन्नईतच वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहणार आहे.”

https://twitter.com/BCCI/status/1711319295568015591

ईशानला मिळू शकते संधी
शुबमन गिल पहिल्या सामन्याला मुकल्यामुळे त्याच्या जागी इशान किशन याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याला संधीचं सोनं करता आलं नव्हतं. तो शून्यावर बाद झाला होता. आता अफगाणिस्तानविरुद्धही शुबमन खेळणार नसल्यामुळे, त्याच्या जागी इशानलाच सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते.

भारताचा विजय
भारतीय संघाने विश्वचषकातील अभियानाची दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 41.2 षटकात 4 विकेट्स गमावत 201 धावा कुटत सामना 6 विकेट्सने आपल्या नावावर केला होता. यावेळी भारताकडून विराट कोहली (85) आणि केएल राहुल (नाबाद 97) यांनी महत्त्वपूर्ण खेळी साकारली. (odi world cup 2023 shubman gill will miss second match bcci give update)

हेही वाचा-
नेदरलँड्सने न्यूझीलंडविरुद्ध केली कमाल! कॉनवे-यंगच्या नावे 48 वर्षापूर्वींचा नकोसा विक्रम
आले किती गेले किती, पण वनडेतील ‘चेज मास्टर’ विराटच; सरासरी पाहून तोंडात घालाल बोटे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---