झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत शनिवारी (24 जून) यजमान झिम्बाब्वे विरूद्ध वेस्ट इंडिज असा सामना खेळला गेला. विश्वचषक पात्रतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने शानदार खेळाचे प्रदर्शन करत 25 धावांनी विजय मिळवला. या विजयामूळे झिम्बाब्वे विश्वचषक पात्रतेच्या जवळ पोहोचल्याचे दिसून येते. अष्टपैलू सिकंदर रझा हा झिम्बाब्वेच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
68 (58), 2/36 and 2 catches 🔥
Sikandar Raza is the @aramco #POTM for his sensational all-round display in the #ZIMvWI match at the #CWC23 Qualifier ✨ pic.twitter.com/KdyxIO4ZXx
— ICC (@ICC) June 24, 2023
हरारे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात झिम्बाब्वे संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. कर्णधार एर्विनने 47 धावांची खेळ करत संघाला चांगली सुरुवात दिली. त्यानंतर मधल्या फळीत सिकंदर रझा याने पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून येत 68 धावांची खेळी केली. रायन बर्ल याने देखील अर्धशतक झळकावून संघाला 268 पर्यंत मजल मारून दिली.
या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजसाठी कायले मेयर्स याने एकमेव अर्धशतक केले. निकोलस पूरन आणि रोस्टन चेस यांनी विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, झिम्बाब्वेच्या सर्वच गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला विजयापासून वंचित ठेवले. अर्धशतक तसेच दोन बळी मिळवणाऱ्या सिकंदर रझा याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. झिम्बाब्वेचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला.
(ODI World Cup Qualifiers Zimbabwe Beat West Indies By 25 Runs Sikandar Raza Shines)
महत्वाच्या बातम्या-
कुणाचं कमबॅक, तर कुणाची पहिलीच वेळ, ‘या’ 5 खेळाडूंना विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियात मिळाली जागा
शमीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे संघातून का वगळलं? खरं कारण आलं समोर, लगेच वाचा