पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत प्ले ऑफ लढतीत ओडिशा जगरनाट्स संघाने गुजरात जायंट्स संघाचा असा 57-43 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, याआधीच्या एलिमीनेटर लढतीत कर्णधार प्रतीक वाईकरच्या अफलातून संरक्षनामुळे तेलगु योद्धाज संघाने चेन्नई क्विक गन्स संघाचा 61-43 असा 18 गुणांच्या फरकाने पराभव करून क्वालिफायर 2 सामन्यासाठी पात्र होण्याचा मान मिळवला. मात्र या पराभवामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात आले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी तेलगु योद्धाज संघाचा सामना आता क्वालिफायर 1 लढतीतील पराभुत झालेल्या गुजरात जायंट्स संघाशी उद्या शनिवारी, 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.तेलगु योद्धाज व गुजरात जायंट्स यांच्यातील विजेता संघ रविवारी, 4 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 7वाजता होणाऱ्या अंतिम फेरीत ओडिशा जगरनाट्स संघाशी विजेतेपदासाठी झुंजणार आहे.
सूरज लांडे याने 13 गुणांची नोंद करताना ओडिशाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.त्याने 5गडी बाद केले.दिलीप खांडवीने अखेरच्या सत्रात 3.48मिनिटे सरंक्षण करताना त्याला सुरेख साथ दिली. तर गुजरात संघाकडून अभिनंदन पाटीलने 10गुण नोंदवताना एकाकी झुंज दिली.या परभवानंतरही गुजरात संघाला अंतिम फेरी गाठण्याची अजून एक संधी आहे.
त्याआधी लीगमधील आतापर्यंतच्या सर्वोत्तम दोन संघांमधील लढतीत ओडिशा संघाने पहिल्याच सत्रात 23गुण नोंदवून वेगवान प्रारंभ केला. दुसऱ्या सत्रात गुजरातला केवळ 18गुण मिळवण्याची संधी देताना ओडिशाने आपले वर्चस्व कायम राखले.
मिलिंद चावरेकर आणि अविनाश देसाई यांनी 2मिनिटे 38सेकंद नाबाद राहताना 2बोनस गुण मिळवून दिल्यामुळे पहिल्या डावा अखेर ओडिशाला 27-18अशी आघाडी घेता आली.
तिसऱ्या सत्रातही ओडिशाने 24 गुणांची भर घालताना सामन्यावरील पकड कायम राखली.लांडे आणि आदित्य कुदळे यांनी स्काय डाईव्हच्या सहाय्याने प्रत्येकी 2गडी बाद करताना ओडिशाला 12 गुण मिळवून दिले.
अखेरच्या सत्रातही ओडिशाने आपले वर्चस्व कमी होऊ दिले नाही. खांडवीने 3मिनिटे48सेकंद संरक्षण करताना गुजरातला रोखुन धरले त्याच्या या खेकीमुळे ओडिशाला 6 बोनस गुण मिळवून 57-43 अशा विजयाची पुर्तता करता आली.
याआधीच्या एलिमीनेटर लढतीत प्रतीक वाईकरने पहिल्या डावातील 3मिनिटे 44 सेकंदासह एकूण 6मिनिटे 43 सेकंद सरंक्षण करताना तेलगु योद्धाजच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. आदर्श मोहितेने 6 खेळाडूंना बाद करताना एकूण 16 गुण मिळवून त्याला सुरेख साथ दिली. त्यातील चार गुण उत्कृष्ट डाईव्हच्या साहाय्याने मिळवले. चेन्नई संघाकडून अमित पाटील(3.59मिनिटे) आणि मदन(8गुण )यांनी दिलेली झुंज अपुरी ठरली.
त्याआधी प्रतीक वाईकरने पहिल्या सत्रात बी राजू याला उत्कृष्ट डाईव्ह वर बाद करताना तेलगु योद्धाजचे खाते उघडले. रामजी कश्यप(3.14मिनिटे)आणि अमित पाटील(3.59मिनिटे)यांच्यामुळे चेन्नईला 2बोनस गुण मिळाले. तरीही तेलगु योद्धाजने पहिल्या सत्रा अखेर 19-06अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रात वाईकरने 3मिनिटे44सेकंद पळती करताना तेलगू योद्धाजला 6 बोनस गुण मिळवुन दिले.तरीही चेन्नई संघाने 20गुण मिळवताना पहिल्या डावा अखेर 26-25 अशी निसटती आघाडी घेतली.
अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या पहिल्या डावा नंतर तेलगू संघाने तिसऱ्या सत्रात आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी चेन्नईचे 13गडी बाद करताना 34 गुणांची भर घालून तिसऱ्या सत्रा अखेर घेतलेली 59-26 ही आघाडी चेन्नईच्या आवाक्याबाहेरची होती.
अमित पाटीलच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने चौथ्या सत्रात आटोकाट प्रयत्न केले. परंतु वाईकरच्या 2मिनिटे59सेकंदाच्या बचावामुळे चेन्नईला निर्णयाक सत्रात केवळ 17 गुणांवर रोखून तेलगु योद्धाज 18गुणांनी दणदणीत विजयाची नोंद केली.
विजयानंतर प्रतीक वाईकर म्हणाला की, आजच्या सामन्यात आम्ही 100 टक्के योगदान दिले व त्यामुळे आम्ही विजय मिळू शकलो. पहिल्या डावात नाममात्र आघाडीवर असलेल्या चेन्नईविरुद्ध आमच्या संघातील खेळाडूंनी जोरदार आक्रमण आणि वेगवान खेळ केला व पिछाडी भरून काढली. त्यानंतर सामन्यावर आमचे वर्चस्व आम्ही कायम ठेवले आणि विजय मिळवला.
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाला एकाच खेळाडूत मिळाला हार्दिक आणि पोलार्ड! मुंबई इंडियन्ससोबत खास कनेक्शन
पाकिस्तानी दिग्गज झालाय सूर्याच्या खेळाचा चाहता! स्वत: केले त्याच्या खेळीचे कौतुक
पुजारा नंतर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने इंग्लंडमध्ये खेळण्याचा घेतला निर्णय