---Advertisement---

Ranji Trophy 2024 । चुकीचा कामात सापडला ओडिसाचा खेळाडू, हंगामातील पहिल्याच सामन्यात कारकिर्दीचा शेवट!

Team India cap
---Advertisement---

रणजी ट्रॉफी 2024 हंगामाची सुरुवात शुक्रवारी (5 जानेवारी) झाली. पण स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ओडिसा संघाच्या एका खेळाडूच्या कारकिर्दीचा जवळपास शेवटच झाला. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने ओडिसाचा खेळाडू सुमित शर्मा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली. शुक्रवारी हंगामातील आपला पहिला रणजी सामना खेळण्यासाठी सुमित बडोद्यात पोहोचला. पण सामन्याआधीच नियामक मंडळाची शिस्तपालन समितीने त्याला निलंबित केले.

बीसीसीआयकडून अशी माहिती दिली गेली की, सुमित कुमार (Sumit Sharma) याने त्याचे वय दाखवणाऱ्या कागदपत्रांमध्ये फेरबदल केले होते. याच कारणास्तव त्याच्यावर बोर्डाकडून दोन वर्षांची बंदी घातली गेली. ओडिसाच्या कटकमध्ये जन्मलेला 28 वर्षी सुमित शर्मा एक अष्टपैलू खेळाडू आहे. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजीसह तो फलंदाजीही करू शकतो. त्याला बीसीसीआयकडून निलंबित केल्यानंतर ओडिसा क्रिकेट बोर्डाने संघात तारिणी सा याला सामील केले. पण प्लेइंग इळेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नाही.

माध्यमांतील वृत्तांनुसार सुमित शर्मा याने जमा केलेली कागदपत्रे 2015-16 हंगामातील कागदपत्रांशी जुळत नव्हते. याच कारणास्तव अष्टपैलू खेळाडूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. तापासानंतर सुमित शर्मावार आयसीसीने अखेर कारवाईचा निर्णय घेतला. आयसीसीकडून सुमितवर घातलेली बंदी ही दोन वर्षांची आहे. पण अष्टपैलूला या बंदीनंतर संघात पुनरागमन करणे नक्कीच सोपे नसेल. अशात त्याची कारकिर्दी संपली, असेही बोलले जात आहे.

दरम्यान, रणजी हंगामाच्या सुरुवातीचा ओडिशा संघाचा पहिला सामना बडोदा संघासोबत होत आहे. उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक ओडिसाने जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या बडोदा संघाने पहिल्या दिवसाखेर 6 विकेट्सच्या नुकसानावर 322 धावांपर्यंत मजल मारली. मितेश पटेल आणि अतित शेठ अनुक्रमे 94* आणि 56* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. (Odisha team’s Sumit Sharma banned by BCCI for two years)

महत्वाच्या बातम्या – 
ICC World Test Championship: केपटाऊन कसोटीनंतर भारत गुणतालिकेत अव्वल, दक्षिण आफ्रिका ‘या’ क्रमांकावर
धक्कादायक! एमएस धोनीला मित्रांनीच लावला कोट्यावधी रुपयांचा चुना, सीएसके कर्णधाराने ठोकली केस

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---