---Advertisement---

रोहित ‘द ग्रेट लीडर’! ड्रिंक्स ब्रेक दरम्यान हिटमॅनची मैदानात एन्ट्री, संघाचं मनोबल वाढवलं

On: शनिवार, जानेवारी 4, 2025 7:57 AM
---Advertisement---

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सिडनी येथे सुरू असलेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5वी कसोटी खेळत नाहीये. पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चाहत्यांना मैदानावर त्याची झलक पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, रोहित मैदानावर आला आणि त्याने उत्कृष्ट गोलंदाजी आणि कर्णधारा जसप्रीत बुमराह छाती थोपटले. यावेळी त्याने रिषभ पंतशीही चर्चा केली. रोहितने ना खेळाडूंना पाणी दिले, ना छत्री धरली असली तरी हिटमॅनची झलक पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत फलंदाजीतील खराब कामगिरीनंतर रोहित शर्माने स्वतः बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maha Sports (@maha_sports)

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली. जसप्रीत बुमराहने मार्नस लॅबुशेनला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मोहम्मद सिराजने एकाच षटकात सॅम कॉन्स्टन्स आणि ट्रॅव्हिस हेडला बाद केले. सिडनी कसोटीत 185 धावांत सर्वबाद झाल्यानंतर टीम इंडियाचे हे दमदार पुनरागमन आहे. वृत्त लिहेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 विकेट गमावून 101 धावा आहे. जर टीम इंडियाने येथून आणखी एक किंवा दोन विकेट घेतल्या तर ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर ढकलली जाईल.

5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. सिडनी कसोटी जिंकण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संघाला कायम राखता येणार नाही. तर WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशाही कायम राहतील.

हेही वाचा-

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियन भूमीवर रचला इतिहास, 47 वर्ष जुना विक्रम मोडला
IND vs AUS; कांगारू फलंदाजांना जसप्रीत बुमराहची भिती, अष्टपैलू खेळाडू स्पष्टच बोलला
IND vs AUS; रोहित शर्माची निवृत्ती फिक्स? निवडकर्त्यांनी स्पष्टच सांगितले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---