लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी (१५ ऑगस्ट) भारतीय संघाने ६ गडी बाद १५४ धावा केल्या होत्या. तसेच पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय संघ १५४ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला होता. परंतु सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला.
भारतीय संघातील मुख्य फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर चौथ्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले होते. परंतु हे दोघे मोठी खेळी करू शकले नाही. सुरुवातीला चेतेश्वर पुजारा ४५ धावा करत माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे देखील ६१ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर पाचव्या आणि निर्णयक दिवशी (१६ ऑगस्ट) फलंदाजीला आलेला रिषभ पंत मोठी खेळी करून भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचे योगदान देईल अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु तो पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच माघारी परतला.
रिषभ पंत फलंदाजी करत असताना ८६ वे षटक टाकण्यासाठी ऑली रॉबिन्सन गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसरा चेंडू ऑली रॉबिन्सनने योग्य लाईन लेंथवर टाकला होता. या चेंडूवर रिषभ पंतने रक्षात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चेंडू बॅटचा कडा घेत यष्टिरक्षक जोस बटलरच्या हातात गेला आणि त्याने कुठलीही चूक केली नाही. अशाप्रकारे रिषभ पंत ४६ चेंडुंमध्ये २२ धावा करत माघारी परतला. (Ollie Robinson sent back Rishabh pant to the pavelian watch video)
Huge wicket at the start of the day! 💥
Scorecard/Clips: https://t.co/GW3VJ3wfDv
🏴 #ENGvIND 🇮🇳 | #RedForRuth pic.twitter.com/8LQFCbTBXY
— England Cricket (@englandcricket) August 16, 2021
रिषभ पंत बाद होऊन माघारी परतल्यानंतर ईशांत शर्मा देखील २४ चेंडूंमध्ये १६ धावा करत बाद झाला होता. ईशांतला देखील रॉबिन्सनने पायचीत करत माघारी धाडले होते. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची जोडी महत्वपूर्ण भागीदारी करून जास्तीत जास्त करण्याच्या प्रयत्नात आहे. जसप्रीत बुमराह नाबाद ३० तर मोहम्मद शमी नाबाद ५२ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvIND, 2nd Test, 5th Day Live: बुमराह-शमीची अर्धशतकी भागिदारी, भारताने पार केला २५० धावांचा आकडा
इंग्लंडच्या खेळाडूंची लॉर्ड्स कसोटीत चेंडूशी छेडछाड? भारतीय प्रशिक्षकाने दिली प्रतिक्रिया
इंग्लंडला पराभवाची वाटतेय भिती; अनुभवी खेळाडू म्हणाला, ‘भारताने ५०-६० धावा केल्यास…’