इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसापासूनच दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. असाच काहीसा प्रकार सामन्यातील पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट) देखील पाहायला मिळाला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
इंग्लंड संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना ज्यावेळी जेम्स अँडरसन फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी भारतीय गोलंदाजांनी बाऊन्सर चेंडूंचा मारा करायला सुरुवात केली होती. या दरम्यान बुमराह आणि जेम्स अँडरसन या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले होते.
आता सामन्यातील पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट) जेव्हा जसप्रीत बुमराह फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी इंग्लिश गोलंदाजांनी जसप्रीत बुमराहवर बाऊन्सर चेंडूचा मारा करायला सुरुवात केली होती. अप्रतिम गोलंदाजी केल्यानंतर भारतीय गोलंदाज फलंदाजी करत असताना देखील इंग्लडच्या गोलंदाजांचा घाम काढत होते. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड हा जसप्रीत बुमराहला उकसवण्याच्या प्रयत्न करत होता.
यावेळी वुडने बुमराहला काहीतरी म्हटले होते, ज्यावर बुमराहने देखील ताबडतोड उत्तर दिले होते. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. परंतु पंचांनी हस्तक्षेप करत हे प्रकरण वेळेत थांबवले. त्यानंतर यष्टिरक्षक जोस बटलरने देखील या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार जो रूटदेखील बाजूला उपस्थित होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बुमराह म्हणतोय, “मी त्याला म्हणालोच नाही की वेगवान चेंडू टाकू नकोस.”(Jos Buttler and mark wood started sledging and verbals with jasprit bumrah, watch video)
https://twitter.com/SonyLIV/status/1427229261207724034?s=20
बुमराह आणि शमीने इंग्लिश गोलंदाजांना दिला चोप
या चकमकीनंतर बुमराहने वूडसह पूर्ण इंग्लंड संघाचा घाम काढला. भारतीय संघातील मुख्य फलंदाज लवकर माघारी परतल्यानंतर ५ व्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय गोलंदाजांनी फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी मिळून लंचपर्यंत भारतीय संघाला २८६ धावांपर्यंत पोहचवले आहे. मोहम्मद शमी नाबाद ५२ तर जसप्रीत बुमराह नाबाद ३० धावांवर फलंदाजी करत आहे. भारतीय संघाने २५९ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्देवी! पंतकडून लाखो चाहत्यांचा अपेक्षाभंग, इंग्लिश गोलंदाजांच्या चेंडूवर दिला सोपा झेल
इंग्लंडच्या खेळाडूंची लॉर्ड्स कसोटीत चेंडूशी छेडछाड? भारतीय प्रशिक्षकाने दिली प्रतिक्रिया






