यंदाच्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन फ्रान्सच्या पॅरिस शहरात करण्यात आलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघासह इतर देशांचे संघ सुद्धा पॅरिसला पोहोचले आहेत. यंदा जगभरातील 10 हजारांहून अधिक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. पण यादरम्यान, मंगोलियन खेळाडूंच्या जर्सीची चर्चा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मंगोलियन खेळाडूंच्या जर्सीकडे इतके लक्ष का जात आहे? हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
मंगोलियाच्या मिशेल आणि अमेझोन्का या दोन बहिणींनी नुकतेच पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी संघाच्या जर्सीचे अनावरण केलं होतं. तेव्हापासून या जर्सीचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जगभरातील लोकांना हा मंगोलियन ड्रेस पाहायला आवडत आहे. हा ड्रेस परिधान केलेल्या खेळाडूंचा फोटो अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही.
मॉडेलनं सध्या ही जर्सी घातली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मॉडेल्स पारंपरिक मंगोलियन आकृतिबंध असलेले कपडे परिधान करताना दिसत आहेत. महिला मॉडेलपैकी एकाने महिला टीम मंगोलियाची जर्सी घातली आहे. ज्यामध्ये एक झगा आहे. (ज्याला डील म्हणून ओळखले जाते, जे मंगोलियन अजूनही घालतात) या जर्सीमध्ये नक्षीदार बनियान, पोतली बॅग, टाच आणि कानातले आहे. तर दुसऱ्या महिला मॉडेलनं समान नक्षीदार बनियान, एक प्लीटेड स्कर्ट, ब्लाउज, हँडबॅग आणि कानातले घातले होते. ही महिलांची जर्सी आहे.
पुरुष जर्सी ही एक पातळ सुती मंगोलियन पोशाख आहे. जो मंगोलियामध्ये शुभ मानला जातो. या जर्सीला बनियान, पारंपारिक मंगोलियन शूज आणि सुशोभित बेल्टने सजवले आहे. यादरम्यान, पुरुष खेळाडूंच्या ड्रेसमध्ये पँट, मँडरीन कॉलर शर्ट, एम्ब्रॉयडरी बनियान आणि स्नीकर्स आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या खेळांमध्ये जगातील 10 हजारांहून अधिक खेळाडू पदक जिंकण्यासाठी संघर्ष करणार आहेत. तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, घोडेस्वारी, गोल्फ, हॉकी, शूटिंग, नौकानयन, टेबल टेनिस, टेनिस, कुस्ती, वेल्टलिफ्टिंग, पोहणे, रोव्हिंग, ज्युडो हे 16 खेळ ऑलिम्पिक स्पर्धामध्ये खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
यष्टीरक्षक रिषभ पंत सीएसकेत घेणार धोनीची जागा? आयपीएल 2025 मध्ये होऊ शकतो मोठा फेरबदल
बीसीसीआयचा नवा आदेश, स्टार खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य; या तीन जणांनाच सूट
भारताच्या माजी प्रशिक्षकाला आहे विश्वास, संधी मिळाल्यास ‘हा’ धाकड फलंदाज बनू शकतो कसोटीचा स्टार