सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आज (01 ऑगस्ट) सहावा दिवस भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण भारतीय खेळाडू आज ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भारतीय बॅडमिंटनमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पुरुष एकेरी बॅडमिंटन सामन्यात आज (01 ऑगस्ट) भारताचे दोन खेळाडे आमने सामने येणार आहेत. राऊंड ऑफ-16 फेरीत एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन भिडणार आहेत.
दोन्ही खेळाडूंच्या मागील सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रणॉयने ग्रुप स्टेज गेममध्ये व्हिएतनामच्या ले डक फाटविरुद्ध 16-21, 21-11, 21-12 असा विजय मिळवला होता. दरम्यान, लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरुद्ध 21-18, 21-12 असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. आता अश्या स्थितीत दोघांपैकी एक जण (भारतीय) उपांत्यपूर्व फेरी गाठणार हे निश्चत आहे. दोन अव्हानात्मक खेळाडू आमने सामने येणार असल्याने या सामन्यात थ्रीलर पाहण्यास मिळणार आहे.
आपल्या विजयानंतर बोलताना लक्ष्य म्हणाला, “मला वाटतं की आजचा सामना खूप कठीण होता, मी ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे मी आनंदी आहे. होय, नक्कीच (सुवर्ण पदकाच्या नजरेत आहे). मला वाटते की गेल्या काही महिन्यांपासून फॉर्म खरोखरच चांगला आहे. चढ-उतार होते, पण एकंदरीत, गेल्या काही महिन्यांत मी चांगल्या स्थितीत होतो आणि विशेषत: येथे फ्रेंच ओपनमध्ये खेळताना, मला माझी गती मिळाली.
या दोन खेळाडूंच्या हेड टू हेड कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, इंडिया ओपन 2022 पासून इंडिया ओपन 2023 पर्यंत, लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय सात वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये लक्ष्य सेनचा वरचष्मा राहिला आहे. लक्ष्य सेनने एचएस प्रणॉयचा चार वेळा पराभव केला आहे, तर एचएस प्रणॉयने लक्ष्य सेनचा तीनदा पराभव केला आहे. दोघांनी यापूर्वी इंडिया ओपन 2023, मलेशिया ओपन 2023, डेन्मार्क ओपन 2022, वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022, इंडोनेशिया ओपन 2022, जर्मन ओपन 2022, इंडिया ओपन 2022 या स्पर्धांमध्ये आमनेसामने पाहिले आहेत.
हेही वाचा-
रिटेन्शन नियमांबाबात संघ मालकांतच ‘हमरी-तुम्हरी’; जाणून घ्या बीसीसीआय आणि फ्रेंचायझीच्या बैठकीत काय झाले?
‘तुझा सध्याचा आवडता क्रिकेटर कोण?’, समोरुन प्रश्न येताच धोनीचे क्षणात उत्तर….
क्रिकेट जगतावर शोककळा! टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन