---Advertisement---

भारतीय वंशाच्या ओमानी क्रिकेटरची पुन्हा तळपली बॅट, बांगलादेशला १२१च्या स्ट्राईक रेटने दिला चोप

On: बुधवार, ऑक्टोबर 20, 2021 7:30 AM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये ओमान संघ शानदार करतो आहे. त्यांच्या या यशस्वी प्रदर्शनामागे सलामीवीर फलंदाज जतिंदर सिंग याचा मोठा हात आहे. बांगलादेशविरुद्ध ओमानला २६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु ओमानकडून सर्वाधिक धावा कुटत जतिंदरने पुन्हा आपल्या प्रदर्शनाची छाप सोडली. यापूर्वीच्या पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यातही त्याच्या धुव्वादार अर्धशतकामुळे संघ विजयी होऊ शकला होता.

बांगलादेशविरुद्धच्या टी२० विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात ओमानचा संघ प्रथम गोलंदाजी करत होता. यावेळी बांगलादेशने सलामीवीर मोहम्मद नईमच्या ६४ धावा आणि शाकिब अल हसनच्या ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात सर्वबाद १५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ओमानकडून जतिंदरने एकहाती झुंज दिली होती. सलामीला फलंदाजीला येत ३३ चेंडूंमध्ये १२१.२१ च्या स्ट्राईक रेटने ४० धावा काढल्या होत्या. यादरम्यान त्याने १ षटकार आणि ४ चौकारही मारले होते. मात्र शाकिबने त्याला झेलबाद करत ओमाvच्या आशांना धक्का पोहोचवला होता.

यापूर्वीही जतींदरने पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात सलामीला नाबाद ७३ धावांची खेळी केली आहे. ४२ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त त्याने आपला सहकारी अकिब एलिससोबत मिळून १३१ धावांची अभेद्य भागिदारी करण्याचाही पराक्रम केला होत्या.

असा केला पंजाब ते ओमानचा प्रवास
जतिंदरचा जन्म भारतातील पंजाबच्या लुधियाना शहरातील आहे. परंतु त्याचे वडील गुरमेल सिंग हे १९७५ मध्ये शाही महालामध्ये सुतारकाम करण्यासाठी ओमानमध्ये आले होते. त्यावेळी जतिंदर १४ वर्षांचा होता. पुढे त्याचे संपूर्ण कुटुंब ओमानमध्येच स्थायी झाले. त्यामुळे जतिंदरही ओमानमध्येच लहानाचा मोठा झाला आहे.

या यष्टीरक्षक फलंदाजाने ओमानकडून १९ वर्षांखालील क्रिकेट खेळले आहे. याबरोबरच २००७ सालच्या एसीसी १९ वर्षांखालील एलाइट चषकातही तो ओमान संघाचा भाग होता. हाँगकाँगविरुद्धच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एका सामन्यात ५ फलंदाजांना यष्टीचीत करण्याचा मोठा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ओमानची निर्णायक क्षणी हाराकिरी; विजयामुळे बांगलादेशच्या सुपर १२ च्या आशा कायम

ट्रोलर बाबर! ‘बूढ़ा हो गया है’ म्हणत घेतली सहकाऱ्याची शाळा; पाहा व्हिडिओ

अभिमानास्पद! अवघ्या १२ वर्षीय मुलीने स्कॉटलंड संघाची जर्सी केली डिझाइन, होतंय भरपूर कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---