भारत आणि कसेटी सामन्यात आत्तापर्यत जसप्रीत बुमराहचा जलवा पहायला मिळाला आहे. तसेच दुसरा सामना जिंकण्यात जसप्रीत बुमराहचं मोलाचं योगदान होतं. पण तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहला फक्त एक गडी बाद करण्यात यश आलं. पण ही विकेट भारतासाठी महत्त्वाची होती. जो रूटला अवघ्या 18 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. मागच्या पाच डावात जसप्रीत बुमराहने तीनवेळा जो रूटला तंबूचा रस्ता दाखवला आहे.
याबरोबरच, कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडू 21 वेळा आमनेसामने आले. यात 9 वेळा जो रूट तंबूचा रस्ता दाखवला आहे. तसेच राजकोटमध्ये बुमराह भूत मानगुटीवरून काढण्याचा जो रूटने पुरेपूर प्रयत्न केला. रिव्हर्स लॅप शॉट्स खेळून बुमराहला बुचकळ्यात पाडण्याचा प्रयत्न होता. पण हीच रणनिती जो रुटसाठी बूमरँग ठरली. या शॉट्समध्ये जो रूट माहिर आहे. पण यावेळी बुमराहचा सामना करताना रणनिती फेल ठरली आहे.
तसेच मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात रुट पहिल्या डावात अशा पद्धतीने बाद झाला की, इंग्लंडचे दिग्गज त्याच्यावर टीका करत आहेत. इतकंच नाही तर इंग्लिश मीडियाही त्याच्या शॉटवर टीका करत आहे, जो तो आऊट झाला. या डावात रूटने केवळ 18 धावा जोडल्या आणि जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर तो बाद झाला होता. आता त्याच्या या शॉटवर जोरदार टीका देखील होत आहे.
Lightning reflexes from Jaiswal! ⚡️👏
A bright start for Bumrah & #TeamIndia 😍💪 on Day 3! 🔥#INDvENG #JioCinemaSports #BazBowled #IDFCFirstBankTestSeries pic.twitter.com/y4FwWbIX5K
— JioCinema (@JioCinema) February 17, 2024
‘द टेलिग्राफ’ या इंग्रजी वृत्तपत्रात जो रूटच्या रिव्हर्स स्कूपला इंग्लिश क्रिकेटमधील सर्वात मूर्ख शॉट म्हटले आहे. तर ‘या शॉटला इंग्लंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट आणि मूर्ख शॉट म्हणून मानांकन दिले पाहिजे.’ आत्तापर्यंत जो रूट या मालिकेत खेळल्या गेलेल्या 5 डावात केवळ 70 धावा करू शकला आहे. त्याची सरासरी केवळ 14 आहे.
Utter rubbish piers .. the skipper doesn’t Bazball .. he plays the situation .. Joe is far too good to gift India such a cheap wicket 20 mins into a crucial day when they are down to 10 players .. Sport is about changing styles at the right time .. https://t.co/e5mTxriTFq
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 17, 2024
दरम्यान, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉनने जो रूटच्या खराब फॉर्मबाबत वक्तव्य केलं आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, फक्त 10 खेळाडूंसोबत खेळत आहे… हा खेळ योग्य वेळी योग्य बदलाबद्दल आहे.
महत्वाच्या बातम्या –
- दुर्दैवी! फक्त एक चुक अन् शतकाजवळ पोहचलेला गिल झाला रन-आऊट, पाहा व्हिडीओ
- अरबी पोशाखामुळे वीरेंद्र सेहवाग ट्रोल! सोशल मीडियावर नेटकरी म्हणाले, “हाच…