---Advertisement---

२००३ला याच दिवशी टीम इंडियाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला गेला

On: मंगळवार, मार्च 24, 2020 8:21 AM
---Advertisement---

भारतीय संघाने २ वेळा वनडे विश्वचषक आपल्या खिशात घातला आहे. यातील पहिला विश्वचषक हा १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात तर दुसरा विश्वचषक हा २०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात आपल्या नावावर केला होता.

भारतीय संघाला २००३मध्ये विश्वचषक जिंकण्याची संधी होती. परंतु या संधीचे सोने भारताला करता आले नाही. या विश्वचषकाचे आयोजन दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे आणि केन्या या देशांनी मिळून केले होते. ज्यामध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. परंतु या लढतीत भारतीय संघाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत केले होते.

या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केले होते. धोनीपूर्वी भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून गांगुलीकडे पाहिले जात होते. गांगुलीने भारतीय संघाला अनेक मोठ-मोठ्या मालिका जिंकून दिल्या होत्या.

इतकेच नव्हे तर २००३च्या विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यात पोहोचविण्याचे कामदेखील गांगुलीने केले होते. परंतु एका चुकीमुळे भारताने हा विश्वचषक गमावला. ही चूक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार रिकी पाँटिंगची (Ricky Ponting) विकेट न घेतल्यामुळे. या सामन्यात पाँटिंगने आपल्या कारकीर्दीतील सर्वात अविस्मरणीय खेळी खेळून संघाला विजयाचा मानकरी बनवले होते.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गिल ख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन सलामीला फलंदाजी करण्यासाठी आले होते. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

यावेळी हेडन ३७ धावा करून बाद झाला होता. परंतु गिलख्रिस्टने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाँटिंग आला होता. पाँटिंगने डेमिन मार्टनसोबत मिळून भारतीय गोलंदाजांना चिंतेत टाकले होते.

या सामन्यात पाँटिंगला कोणीही बाद करू शकले नाही. त्याने या सामन्यात १२१ चेंडूत १४० धावा केल्या होत्या. यात ४ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता.

पाँटिंगच्या या उत्कृष्ट शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने २ बाद ३५९ धावांचा भला मोठा आकडा उभा केला होता.

ऑस्ट्रेलियाच्या ३६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे भारतीय संघासाठी सोपे नव्हते. तसेच ऑस्ट्रेलिया संघ या विश्वचषकात एकाही सामन्यात पराभूत झाला नव्हता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप जास्त वाढला होता.

भारताकडून सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हे दोन खेळाडू सलामीला फलंदाजी करण्यासाठी आले होते. यावेळी सचिन तेंडुलकरची पहिली विकेट गेल्यामुळे भारताला सर्वात मोठा धक्का बसला होता.

यावेळी ग्लेन मॅकग्राच्या गोलंदाजीवर तेंडुलकर ४ धावांवर बाद झाला होता. तर दुसऱ्या बाजूने सेहवाग फलंदाजी करत होता. परंतु त्याला कोणीही साथ देऊ शकले नाही. यानंतर नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या.

यावेळी सेहवागने सर्वाधिक ८२ धावा केल्या होत्या. तसेच भारतीय संघही २३४ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना १२५ धावांनी जिंकला आणि विश्वचषक आपल्या नावावर केला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात क्रिकेटपटूंना इंंन्शुरन्स देणार हे देशातील पहिलं राज्य

-कोरोनाने १५०० पेक्षा जास्त जीव घेतलेल्या देशात फसले आयपीएल प्लेअरचे वडिल

-त्याच हाॅटेलमध्ये कनिका कपूर थांबली होती, जिथं होता आफ्रिका संघाचा मुक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---