---Advertisement---

क्रिकेटच्या पंढरीत बरोबर ३५ वर्षांपुर्वी टीम इंडियाने पहिल्यांदा फडकवली होती विजयी पताका

---Advertisement---

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी १० जून १९८६ हा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. याच दिवशी भारताने इंग्लंड देशातील क्रिकेटची ‘पंढरी म्हणून’ ओळखल्या जाणाऱ्या लाॅर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर आपला पहिला कसोटी विजय मिळवला होता. क्रिकेटचे जनक समजल्या जाणाऱ्या इंग्लंड संघाला त्यांच्याच मातीत, त्यांच्याच आवडत्या मैदानावर भारतीय संघाने पराभूत केले होते.

काय आहे भारतीय संघाचा लाॅर्ड्सवरील इतिहास

भारतीय संघाने लाॅर्ड्सवर १८ कसोटी सामने खेळले असून यात केवळ २ वेळा विजय मिळवला आहे. पहिला विजय १९८६ तर दुसरा विजय २०१४ साली भारतीय संघाने या मैदानावर मिळवला आहे. याबरोबर १२ पराभव व ४ अनिर्णित सामने भारतीय संघाच्या नशीबी आले. भारताने इंग्लंड देशात आजपर्यंत केवळ ७ विजय मिळवले असून लाॅर्ड्सवर २, लीड्सवर २, नाॅटींग्घम २ व द ओव्हल येथे १ असे हे विजय मिळवले आहे. या कमी विजयांमुळेच भारताच्या लाॅर्ड्सवरील पहिल्या विजयाचे महत्त्व काही खास आहे. या विजयापुर्वी भारतीय संघाने १५ वर्ष आधी १९५१मध्ये इंग्लंडमध्ये विजय पाहिला होता.

असा झाला होता सामना

५ जून ते १० जून १९८६ दरम्यान झालेल्या या सामन्यात भारताने ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ग्रॅहम गूचच्या ११४ व डॅरेक प्रिंगेलच्या ६३ धावांच्या जोरावर सर्वबाद २९४ धावा केल्या. यात गोलंदाजीत भारताकडून चेतन शर्माने ५ विकेट्स घेत लाॅर्ड्सच्या मानाच्या बोर्डावर आपले नाव लावले. राॅजर बिन्नी यांनी देखील ३ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ३४१ धावा केल्या होत्या. व ४७ धावांची महत्त्वपुर्ण आघाडी घेतली. भारताकडून वेंगसरकर यांनी १२६ व मोहिंदर अमरनाथ यांनी ६९ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी डोके वर काढू दिले नाही व इंग्लंडचा डाव १८० धावांवर संपुष्टात आला. मायकेल गॅटिंगच्या ४० धावा या सामन्यातील सर्वोत्तम धावा होत्या.

कपिल देव ४ व मोहिंदर अमरनाथ ३ यांनी भारताकडून गोलंदाजीत कमाल केली होती. त्यानंतर १३६ धावांचं लक्ष घेऊन मैदानात आलेल्या भारतीय संघाने ५ बाद १३६ धावा करत हे लक्ष पार केले. यात भारताकडून वेंगसरकर यांनी ३३, कपिल देव यांनी २३ तर सुनिल गावसकर यांनी २२ धावा केल्या होत्या. भारताचा हा लाॅर्ड्सवरील पहिलाच विजय ठरला होता.

कपिल देव ठरले होते सामनावीर-

गोलंदाजीत ५ विकेट्स व फलंदाजीत दोन्ही डावात मिळून २४ धावा यामुळे ते या सामन्यात सामनावीर ठरले होते. त्यानंतर २०१४मध्ये भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या मैदानावर सामनावीर ठरला होता.

वाचा-

काय सांगता!! एकाच संघातून खेळले होते ६ भाऊ? पाहा कोणी कशी कामगिरी केली होती

मिलर-दुसेन जोडीकडून धावांचा मारा, भारतीय संघापुढे भारतातच रचली सर्वात मोठी भागीदारी

महत्त्वाचा खेळाडू कोरोनाग्रस्त असूनही दक्षिण आफ्रिका संघाने भारताला पाजले पराभवाचे पाणी, खास विक्रमही मोडला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---