---Advertisement---

आजच्याच दिवशी क्रिकेटच्या डाॅनने घेतला होता अखेरचा श्वास

On: सोमवार, फेब्रुवारी 25, 2019 6:22 PM
---Advertisement---

क्रिकेट इतिहासातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी 18 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शेवटचा श्वास घेतला होता. त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी 25 फेब्रुवारी 2001 ला निमोनियामुळे निधन झाले होते.

त्यांच्या नावावर क्रिकेटमधील अनेक विश्वविक्रम आहेत. त्यातील कसोटी क्रिकेटमधील त्यांच्या सर्वोत्तम सरासरीच्या विक्रमाच्या जवळपासही आत्तापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला जाता आलेले नाही. त्यांची कसोटी क्रिकेटमध्ये 99.94 ची सरासरी आहे.

ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेटमध्ये 96 डावात 110.19 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. तर कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध त्यांनी 5 सामने खेळताना 201.50 च्या सरासरीने 806 धावा केल्या आहेत. यापैकी एकदा त्यांची त्रिशतक करण्याची संधी हुकली होती. ते 299 धावांवर नाबाद राहिले. पण त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 6 त्रिशतके केली आहेत.

त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात 1928 मध्ये इंग्लंड विरुद्ध ब्रिस्बेन येथे झाली. पण त्यांना पदार्पणाच्या सामन्यात खास काही करता आले नाही. ते पहिल्या डावात 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आले. यावेळी त्यांनी 18 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात त्यांना एकच धाव करता आली होती.

विशेष म्हणजे या सामन्यात त्यांच्याबरोबर ज्या खेळाडूने पदार्पण केले होते ते
खेळाडू म्हणजे ब्रेट आयर्नमॉन्गर. आयर्नमॉन्गर यांचे या पदार्पणावेळीचे वय होते 46 वर्षे. तर ब्रॅडमन यांचे वय होते 20 वर्षे.

हा सामना इंग्लंडने 675 धावांनी जिंकला. कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीतील हा आजही सर्वाधिक धावांनी मिळवलेला विजय आहे.

ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत 52 कसोटी सामने खेळताना 99.94 च्या सरासरीने 6996 धावा केल्या. यात त्यांच्या 29 शतकांचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी एकूण 234 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळताना 95.14 च्या सरासरीने 28067 धावा केल्या आहेत. यात त्यांनी 117 शतके आणि 69 अर्धशतके केली आहेत.

यामुळे ब्रॅडमन 100 च्या सरासरीला मुकले…

ब्रॅडमन यांची कसोटी क्रिकेटमध्ये 100 ची सरासरी फक्त 4 धावांनी हुकली. ब्रॅडमन जेव्हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटच्या डावात फलंदाजी करण्यासाठी आले तेव्हा इंग्लंडचे फिरकी गोलंदाज एरिक होलिज यांनी ब्रॅडमन यांना शून्य धावेवरच त्रिफळाचीत केले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबईकर पृथ्वी शाॅची जाळ आणि धुर खेळी, षटकार- चौकारांची बरसात

-सांगलीकर स्मृती मंधानाची धुव्वांदार फलंदाजी, टीम इंडियाला मिळवून दिला एकहाती विजय

-वय वर्षे २० असलेल्या राशिद खानचा टी२०मध्ये धमाकेदार कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment