-Sharad Bodage (शरद बोदगे)
आजच्याच दिवशी 14 वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2007 ला भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू यूवराज सिंगने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार मारत इतिहास घडवला होता. त्याने 2007 ला झालेल्या पहिल्या आयसीसी टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता.
या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी 18 व्या षटकात इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि युवराजमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर युवराजने 19 व्या षटकात 21 वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. त्यावेळी तो हर्षल गिब्सनंतरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारणारा दुसराच फलंदाज ठरला होता.
युवराजने या षटकातील पहिल्या चेंडूवर मिडविकेटला षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने स्क्वेअर लेगला षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर वाईड लॉन्ग ऑफवर युवराजने षटकार मारला.
नंतर फुलटॉस आलेल्या चौथ्या चेंडूवरही युवराजने षटकार खेचला. यानंतर युवराजने पाचव्या चेंडूवर स्क्वेअर लेगला तर षटकातील शेवटच्या चेंडूवर वाईड लॉन्ग ऑनला षटकार मारला.
युवराजने हे षटकार मारण्याबरोबरच 12 चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा कारनामा केला. आजही त्याचा हा विक्रम अजून कोणी मोडलेला नाही.
या सामन्यात युवराजने 16 चेंडूत 58 धावा केल्या होत्या. त्याच्या या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 218 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 219 धावांचे आव्हान दिले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकात 6 बाद 200 धावा करता आल्या होत्या. त्यामुळे भारताने या सामन्यात 18 धावांनी विजय मिळवला होता.
या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही युवराजला देण्यात आला होता. पुढे भारताने या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवत पहिल्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपदही मिळवले होते.
#OnThisDay in 2007…@YUVSTRONG12 v @StuartBroad8.
6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣ 😲
Six sixes in an over, and the fastest ever T20I fifty, off just 12 balls! 🔥 pic.twitter.com/xYylxlJ1b6
— ICC (@ICC) September 19, 2018
6⃣6⃣6⃣6⃣6⃣6⃣#OnThisDay in 2007, @YUVSTRONG12 etched his name into the record books by hitting six sixes in an over. 💪💪 pic.twitter.com/VDKAQJLof2
— BCCI (@BCCI) September 19, 2019
तसेच 2019 साली जूनमध्ये युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. पण त्याच्या कारकिर्दीतील इंग्लंड विरुद्ध मारलेले हे 6 चेंडूतील 6 षटकार सर्वांनाच्याच कायम आठवणीत राहिले.
वाचा-
युवराजशी फ्लिंटॉफने पंगा घेतला, पण ब्रॉडने किंमत चुकवली