भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने आजपर्यंत अनेक मोठे पराक्रम केले आहेत. वनडेत ३ द्विशतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. याबरोबरत रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्येही मोठे कारनामे केले आहे. तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ४ शतके करणारा सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे. त्यातील त्याचे दुसरे शतक खुप खास आहे. हे शतक त्याने २२ डिसेंबर २०१७ ला म्हणजेच ५ वर्षांपूर्वी केले होते.
रोहितने त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय टी२० शतक इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध केवळ ३५ चेंडूत पूर्ण केले होते. त्यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलरची बरोबरी केली होती.
इंदोरला भारत विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या या टी२० सामन्यात रोहित भारतीय संघाचे नेतृत्वही करत होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून रोहितने १२ व्या षटकात अँजेलो मॅथ्यूजने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने चौकार मारत त्याचे शतक पूर्ण केले होते. हे शतक त्याने ८ षटकारांच्या आणि ११ चौकारांच्या मदतीने ३५ चेंडूत पूर्ण केले होते. त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. आजही हा विक्रम त्याच्याच नावावर आहे.
त्याच्याआधी मिलरने ऑक्टोबर २०१७ मध्ये ३५ चेंडूत बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये शतक केले होते.
The joint fastest T20I century!
35 balls
11 fours
8 sixesWhat an innings! Take a bow Rohit Sharma! #INDvSL pic.twitter.com/qGiyvuqJXe
— ICC (@ICC) December 22, 2017
रोहितला मिळाली होती केएल राहुलची साथ –
श्रीलंकेविरुद्ध एकीकडे रोहित आक्रमक खेळत असताना त्याला केएल राहुलकडूनही चांगली साथ मिळाली होती. रोहित आणि राहुलने मिळून सलामीला १६५ धावांची भागीदारी रचली होती. ही भागीदारी रोहित बाद झाल्याने तुटली. रोहितला दुशमंथा चमिराने बाद केले. या सामन्यात रोहितने केलेल्या ४३ चेंडूत ११८ धावांच्या खेळीत १२ चौकार आणि १० षटकार ठोकले.
ही खेळी साकारताना रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता. त्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे क्षेत्ररक्षकांना केवळ प्रेक्षकांची भूमीका निभवावी लागली. यावेळी राहुलने ४९ चेंडूत ८९ धावांची खेळी केली होती.
118 runs
43 balls
12 fours
10 sixes
274.41 strike rate
1 incredible inningsBravo @ImRo45!#INDvSL pic.twitter.com/ixZH9ZeXq0
— ICC (@ICC) December 22, 2017
थरंगा आणि परेराची अपयशी झुंज –
रोहित आणि राहुलच्या तडाख्यामुळे त्या सामन्यात भारताने २० षटकात ५ बाद २६० धावा केल्या आणि श्रीलंकेला २६१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १७२ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून कुशल परेराने ७७ आणि उपुल थरंगाने ४७ धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीलंकेच्या अन्य फलंदाज केवळ मैदानावर हजेरी लावून परतले. थरंगा आणि परेरा व्यतिरिक्त केवळ निरोशान डिक्वेल्लाला(२५) दुहेरी धावसंख्या गाठता आली. अन्य सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.
हेही वाचा – शाहरुखचा झंझावात कायम! मेगा लिलावापूर्वी केली आणखी एक वादळी खेळी
२०१९ ला सुदेश विक्रमसेकरने केली रोहित मिलरची बरोबरी
रोहित आणि मिलरने २०१७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद शतके झळकावल्यानंतर २ वर्षांनी म्हणजेच ३० ऑगस्ट २०१९ ला चेक रिपब्लिकच्या सुदेश विक्रमसेकराने त्यांच्या या विक्रमाची बरोबरी केली. सुदेशने तुर्कीविरुद्ध टी२० सामन्यात खेळताना ३५ चेंडूत शतक केले होते.
त्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम रोहित, मिलर आणि सुदेश यांच्या तिघांच्याही नावावर संयुक्तरित्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऋतुराज ते अय्यर, आयपीएलपासून ते टी२० विश्वचषक; ‘या’ १० युवा खेळाडूंचा राहिला बोलबाला
व्हिडिओ पाहा – रोहित शर्माला टीम इंडियाचा वनडे कर्णधार करण्याचा निर्णय ‘या’ ४ कारणांमुळे चुकीचा