---Advertisement---

Bye Bye 2021 | ऋतुराज ते अय्यर, आयपीएलपासून ते टी२० विश्वचषक; ‘या’ १० युवा खेळाडूंचा राहिला बोलबाला

---Advertisement---

वर्ष २०२१ सरले आहे. २०२० वर्ष कोरोनामुळे वाया गेले होते. या वर्षात अनेक मोठ मोठ्या मालिका आणि स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. याच स्पर्धा २०२१ मध्ये पुन्हा एकदा त्याच उत्साहाने सुरू झाल्या. परंतु, खेळाडूंना बायो बबलमध्ये राहणं अनिवार्य होतं. ज्यामुळे खेळाडूंना थकवा जाणवू लागला होता. परंतु या सर्व गोष्टींवर मात करत काही खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. चला तर पाहूया २०२१ मध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या युवा फलंदाजांबद्दल अधिक माहिती.

१)ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad): देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाड याने २०२१ मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात धावांचा पाऊस पाडला. त्याने ६३५ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. यासह तो आयपीएल स्पर्धेत ऑरेंज कॅप पटकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. इतकेच नव्हे तर ही स्पर्धा झाल्यानंतर त्याने सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत देखील धावांचा पाऊस पाडला.

२) व्यंकटेश अय्यर (venkatesh Iyer) : आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने व्यंकटेश अय्यर याला संधी दिली होती. मध्यप्रदेशच्या या २६ वर्षीय फलंदाजाला कोलकाता नाईट रायडर्स संघात सलामीवीर फलंदाज म्हणून संधी देण्यात आली होती. या संधीचा त्याने पुरेपूर वापर केला. फलंदाजी करताना त्याने धावांचा पाऊस पाडला. तर गोलंदाजी करताना त्याने गडी देखील बाद केले. या स्पर्धेत त्याने ३२० धावा केल्या. त्यानंतर त्याला न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती.

)हर्षल पटेल (harshal Patel): आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी एका युवा खेळाडूचा जलवा पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील गोलंदाज हर्षल पटेल याने लक्षवेधी कामगिरी केली. त्याने संपूर्ण स्पर्धेत ३२ गडी बाद केले. यासह तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. त्याने पहिल्यांदाच पर्पल कॅप पटकावली. तो आयपीएल स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक गडी (३२ गडी ) बाद करणारा गोलंदाज ठरला. यापूर्वी ड्वेन ब्रावोने देखील ३२ गडी बाद केले होते.

४) कर्टीस कँफर (Curtis Campher) : आयर्लंडचा क्रिकेटपटू कर्टीस कँफर साठी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा आठवणीतली ठरली. त्याने न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात हॅटट्रिक घेतली. यासह तो आयर्लंड संघासाठी टी२० क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला. इतकेच नव्हे तर टी२० क्रिकेटमध्ये ४ चेंडूंवर ४ गडी बाद करत त्याने लसिथ मलिंगा आणि राशिद खान सारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.

५) वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) : श्रीलंका संघाचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाने यावर्षी आपल्या फिरकी गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील ८ सामन्यात १६ गडी बाद केले. या कामगिरीच्या बळावर त्याने आयसीसी टी२० क्रमवारीत सर्वोच्च स्थान गाठले होते. यासह त्याने टी२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅटट्रिक देखील केली होती.

६) उमरान मलिक (Umran Malik) : आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात जम्मू काश्मीरचा गोलंदाज उमरान मलिक भरपूर चर्चेत आला. सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना, त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध १५० किमी/ प्रतीतास गतीने चेंडू टाकला होता. यासह तो आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला होता. त्याची भन्नाट गोलंदाजी पाहून त्याची आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी भारतीय संघात नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती.

७) शाहरुख खान (ShahRukh Khan) : तामिळनाडू संघाचा युवा फलंदाज शाहरुख खान आपल्या तुफान फटकेबाजी साठी चर्चेत आला होता. हेच कारण होते की, पंजाब किंग्ज संघाने त्याला ५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याने या स्पर्धेत अनेकदा महत्वाची खेळी केली. तसेच सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत कर्नाटक संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार मारून त्याने तामिळनाडू संघाला विजय मिळवून दिला होता.

८) केएस भरत (KS Bharat): केएस भरतने याच वर्षी आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी अनेकदा महत्वाची खेळी केली. त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार मारून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजय मिळवून दिला होता. तसेच न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत, वृद्धीमान साहा दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याने यष्टीमागे मोलाची भूमिका बजावली होती.

९) चरिथ असलंका (Charith Asalanka) : श्रीलंका संघाचा युवा खेळाडू चरिथ असलंकाने याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंका संघाला अनेक सामने जिनिन जिंकून दिले. त्याने आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.

१०) महेश दीक्षाना (Mahesh Dikshana) : श्रीलंका संघाकडून आणखी एका गोलंदाजाने पदार्पण केले, तो म्हणजे महेश दीक्षाना. त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात त्याने ३७ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते.

महत्वाच्या बातम्या :

दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजांनी केलेल्या ‘या’ ५ खेळींनी जिंकली सर्वांची मनं

विश्वविजेत्या खेळाडूंचा देशी अंदाज! ‘८३’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी १९८३ बॅचची हजेरी, फोटो व्हायरल

पुनरागमनाची आस! फॉर्ममध्ये परतण्यासाठी केकेआरचा ‘हा’ शिलेदार मैदानात गाळतोय घाम, व्हिडिओ व्हायरल

हे नक्की पाहा : आफ्रिदीने विश्वविक्रम केला, तोही सचिनच्या बॅटने

आफ्रिदीने विश्वविक्रम केला, तोही सचिनच्या बॅटने | When Sachin Tendulkar Helped Shahid Afridi

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---