सचिनने २४ वर्ष आपल्या बॅटची जादू भारतातल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट रसिकांना दाखवली आहे. सचिन हा जगभरात क्रिकेटचं आराध्य दैवत म्हणून ओळखला जातो.
२००७ मध्ये नवीन प्रकार म्हणजेच टी २० विश्वचषकाची तयारी चालू झाली आणि या चषकात सचिन खेळणार नसल्याचे त्याने घोषित केले त्याबरोबरच आणखीन काही वरिष्ठ खेळाडूंनीही हाच निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या विश्वचषकाला धोनी आणि नवीन भारतीय संघ गेला व विश्वचषक जिंकून आणला. या नंतरच बीसीसीआयने नवीन संकल्पनेला जन्म दिला ती म्हणजे “आयपीएल”.
याच आयपीएलमध्ये आजच्या दिवशी १३ वर्षांपुर्वी म्हणजेच १४ मे २००८ रोजी सचिनने पहिले पाऊल ठेवले होते. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर सचिनचा आयपीएल पदार्पणाचा सामना झाला होता.
जगभरातील सचिनच्या चाहत्यांना उत्सुकता होती की या नवीन प्रकारात क्रिकेटचा हा महामेरु कसा खेळ करणार? सचिनकडे मुंबई संघाच्या नेतृत्वाचीही जबाबदारी देण्यात आली होती. सचिनने चौथ्याच सामन्यात आपल्या बॅटची चमक दाखवली आणि त्याने वानखेडेवर ६५ धावांची खेळी केली. त्याबरोबरच नवीन प्रकारात आपले पहिले अर्धशतक नोंदवले होते.
A blessing in Blue & Gold 💙#OnThisDay in 2008, Master Blaster @sachin_rt made his IPL debut for #MI at the Wankhede stadium 😍#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/xt9LpqTFby
— Mumbai Indians (@mipaltan) May 14, 2021
पाहुयात सचिनने आयपीएलमध्ये केलेले काही विक्रम:
१. आयपीएलमधील धावा – २३३४ (७८सामने)
२. १३ अर्धशतके व १ शतक.
३. २०१० चा ओरेंज कॅप विजेता.
४. ऑरेंज कॅप मिळवणारा पहिला भारतीय फलंदाज.
५. एका सामन्यात सर्वाधिक म्हणजेच ४ झेल घेणारा खेळाडू.
६. ५८.८२ % विजयी सरासरी असलेला कर्णधार.
सचिनने सहाव्या प्रयत्नात २०११ मध्ये विश्वचषक जिंकला आणि सहाव्याच प्रयत्नात (२०१३) आयपीएलही जिंकली. आयपीएल जिंकल्यानंतर सचिनने लगेचच आयपीएलमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर मुंबईच्याच रोहित शर्माने मुंबईच्या संघाला चांगली दिशा दाखवली. मुंबईचा संघ 5 आयपीएल विजेतेपद मिळवणारा एकमेव संघ आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा जमली होती ‘मिस्टर ३६०’ आणि ‘रनमशीन’ची जोडी; ९६ चेंडूत २२९ धावा कुटत एकहाती जिंकला होता सामना
टी२० विश्वचषकाची चुरस होणार द्विगुणित, आयसीसी सहभागी संघांची संख्या वाढवून ‘इतकी’ करण्याच्या विचारात