---Advertisement---

सचिनच्या ‘ऐतिहासिक’ वनडे द्विशतकाची 13 वर्ष! आजच्याच दिवशी केलेला कारनामा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 24, 2023 4:09 PM
---Advertisement---

सध्या आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सातत्याने द्विशतके पाहायला मिळतात. मागील दोन महिन्याच्या काळात भारताच्या ईशान किशन व शुबमन गिल या युवा फलंदाजांनी हा कारनामा करून दाखवला. मात्र, आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक ठोकण्यासाठी तब्बल 39 वर्ष जावी लागली होती. आजच्या दिवशी म्हणजे 24 फेब्रुवारी 2010 रोजी ही अद्वितीय कामगिरी करण्याचा मान मिळवला होता भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 200 धावांची खेळी करत इतिहास रचलेला. त्या ऐतिहासिक द्विशतकाला शुक्रवारी (24 फेब्रुवारी) 13 वर्ष पूर्ण होत आहेत.

 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना ग्वाल्हेर येथील कॅप्टन रूप सिंग स्टेडियमवर खेळला जात होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 401 अशी डोंगराएवढी धावसंख्या उभी केली. भारतीय संघाच्या या डावाचे वैशिष्ट्य होते सचिन तेंडुलकर याने झळकावलेले नाबाद द्विशतक. सचिनने या डावात सलामीला फलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात त्याने वनडे क्रिकेट इतिहासातील पहिले द्विशतक पूर्ण केले. सचिनने 147 चेंडूंचा सामना करताना 25 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 200 धावा केल्या.

त्याआधी पाकिस्तानच्या सईद अन्वर व झिम्बाब्वेच्या चार्ल्स कॉन्वेंट्री यांच्या नावे प्रत्येकी 194 धावांच्या सर्वोच्च खेळीची नोंद होती. सचिनने हे द्विशतक ज्या दिवशी ठोकले त्या दिवशी भारतात वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला गेलेला. मात्र, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये केवळ सचिनच्याच नावाची चर्चा होती.

सचिनने पहिले वनडे द्विशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच वर्षी वीरेंद्र सेहवाग याने द्विशतक झळकावण्याचा कारनामा केला. भारताचाच रोहित शर्मा याच्या नावे तीन वनडे द्विशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त भारताचे शुबमन गिल व ईशान किशन ही कामगिरी करू शकलेत. विदेशी क्रिकेटपटूंमध्ये वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल व पाकिस्तानचा फखर झमान यांना अशी कामगिरी करता आली आहे.

(On This Day Sachin Tendulkar Hits First Ever ODI Double Century Against South Africa)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कारकिर्दीतील 9व्या इनिंगमध्ये हॅरी ब्रुकचा विश्वविक्रम, भारतीय दिग्गजाचा मागे टाकत केल्या सर्वाधिक धावा
ते परत येतायेत! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंची लीजेंड्स लीग ‘या’ तारखेपासून होतेय सुरू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---