१. १९३८- इंग्लंडची सर्वात कसोटी धावसंख्या
वेळेची मर्यादा नसलेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कसोटी सामन्यात इंग्लंडचे कर्णधार वॉली हॅमंड यांनी इंग्लंडचा डाव ९०३-७ या धावसंख्येवर घोषित केला. दुखापतीने ग्रासलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला एक डाव व ५७९ धावांनी पराभूत करत इंग्लंडने विक्रमी विजय नोंदवला होता. १९९७ मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध ९५२-६ अशी धावसंख्या उभारत, इंग्लंडचा एका डावातील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडला.
२. १९७४- जहीर अब्बास यांचे इंग्लंडमधील दुसरे द्विशतक
पाकिस्तानचे सर्वकालीन महान फलंदाज जहीर अब्बास यांनी इंग्लंडमध्ये दुसरे द्विशतक झळकावले. १९७१ च्या दौऱ्यावर ओव्हल कसोटीत २४० धावा करत अब्बास यांनी पहिले द्विशतक साजरे केले होते. १९७४ एजबॅस्टन कसोटीत २७४ धावा फटकावून, इंग्लंडमध्ये दोन द्विशतके झळकावणारे पहिले आशियाई फलंदाज होण्याचा मान मिळवला.
३. १९६३- इंग्लिश क्रिकेटपटू व पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांचा जन्म
इंग्लंडचे माजी फिरकीपटू व सध्या पंच म्हणून कामगिरी पाहणारे रिचर्ड इलिंगवर्थ यांचा ब्रॅडफोर्ड येथे जन्म. त्यांनी इंग्लंडचे ७ कसोटी व २५ वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केले. इंग्लंडला १९९२ विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत नेण्यात इलिंगवर्थ यांचे महत्त्वाचे योगदान होते. सध्या ते आयसीसीचे एलिट गटातील पंच आहेत.
४. १९९४- ब्रायन जॉन्स्टन यांचा समालोचक म्हणून अखेरचा दिवस
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम समालोचक म्हणून गणले गेलेले ब्रायन जॉन्स्टन यांनी २३ ऑगस्ट १९९४ या दिवशी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात अखेरचे समालोचन केले होते. त्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला १६१ धावांनी पराभूत करत सामना आपल्या नावे केला होता.
५. २००९- इंग्लंडचा ऍशेस विजय
अँड्र्रूय स्ट्राॅसच्या नेतृत्वात ओव्हल कसोटीत १९७ धावांनी जिंकत इंग्लंडने २-१ अशा फरकाने ऍशेस मालिका आपल्या नावे केली. या पराभवास सोबतच, १८९० पासून बिली मर्डोच यांच्यानंतर इंग्लंडमध्ये सलग दोन ऍशेस मालिकेत पराभूत होणारा रिकी पॉंटिंग पहिलाच कर्णधार ठरला.
वाचा-
–असे ५ प्रसंग जेव्हा खेळाडूंच्या अति आत्मविश्वासामुळे झाले संघाचे नुकसान
–४ सज्जन भारतीय क्रिकेटर, ज्यांनी कधीही केले नाही दारुचे सेवन
–आज जागतिक वडापाव दिन, त्यानिमित्ताने पहा कोणत्या खेळाडूला काय आवडते?