---Advertisement---

पुन्हा एकदा समोरासमोर येणार गिल आणि स्टोक्स! त्रिशतक झळकावलेल्या खेळाडूशी होणार टक्कर

On: बुधवार, ऑगस्ट 6, 2025 7:45 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेलेली अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी आता संपली आहे. या मालिकेत भारतीय कर्णधार शुबमन गिल आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या दोघांनीही अफलातून कामगिरी केली. त्यामुळेच ही मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. आता हे दोन्ही स्टार खेळाडू पुन्हा एकमेकांसमोर येणार आहेत. यावेळी त्यांना दक्षिण आफ्रिकेसाठी त्रिशतक झळकावणाऱ्या वियान मुल्डरकडून कडवी टक्कर मिळणार आहे.

जुलै महिन्यासाठी आयसीसीने मेन्स प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी तीन नावांची निवड केली आहे. यामध्ये शुबमन गिल, बेन स्टोक्स आणि वियान मुल्डर यांचा समावेश आहे. जुलै महिन्यात शुबमन गिलने 3 टेस्ट सामने खेळले, ज्यात त्याने 94.50 च्या सरासरीने 567 धावा केल्या. या काळात त्याने 2 शतके आणि 1 द्विशतक झळकावले. त्यामुळेच तो या शर्यतीत आघाडीवर आहे.

दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने 3 सामन्यांत 50.20 च्या सरासरीने 251 धावा केल्या आणि 26.33 च्या सरासरीने 12 बळी घेतले. स्टोक्सने एका टेस्ट सामन्यात शतक झळकावतानाच 5 बळीही घेतले. त्यामुळेच तो गिलला कडवे आव्हान देत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडू वियान मुल्डरने अलीकडेच झिम्बाब्वे विरुद्ध त्रिशतक झळकावले होते. मुल्डरने जुलै महिन्यात 2 टेस्ट सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 265.50 च्या अविश्वसनीय सरासरीने 531 धावा केल्या. याच दरम्यान त्याने 15.28 च्या उत्कृष्ट सरासरीने 7 बळीही घेतले.

झिम्बाब्वे विरुद्धच्या या सामन्यात मुल्डरकडे 400 धावा करण्याची संधी होती, पण त्याने 367 धावांवर असताना आपली खेळी घोषित केली. या मालिकेत त्याने कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळली होती. त्यामुळेच तो या शर्यतीत ठळकपणे दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---