---Advertisement---

आवडत्या मैदानात दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नवर होणार अंतिम संस्कार! १ लाख लोक लावतील उपस्थिती

On: मंगळवार, मार्च 8, 2022 11:56 AM
Shane-Warne-MCG
---Advertisement---

जगातील महान गोलंदाजांपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शेन वाॅर्नचे (Shane Warne) नुकतेच निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांना धक्का बसला आहे. आता त्याचा अंतिम संस्कार सोहळा पार पडणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियात कोरोनाच्या (Covid 19) संसर्गामूळे निर्बंध लागू आहेत. त्यातच आता मेलबर्नमध्ये वाॅर्नच्या अंतिम संस्कार सोहळ्याला चाहत्यांची गर्दी पाहायला मिळू शकते.

माध्यमांतील वृत्तांनुसार सांगितले जात आहे की, फिरकीचा जादूगार असलेल्या वाॅर्नचा अंतिम संस्कार सोहळा मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर पुढच्या दोन किंवा तीन आठवड्यांमध्ये आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाला १ लाखांहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

यानंतर सार्वजनिक शोकसभेचे आयोजन केले जाणार आहे. वाॅर्नचे मॅनेजर जेम्स एर्सकिने यांनी वाॅर्नचे अंतिम संस्कार एमसीजी येथे होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी सांगितले की, या महान क्रिकेटरची उंची पाहता त्याच्या अंतिम संस्कारासाठी कोणतेही स्टेडियम योग्य नाही. जेम्स एर्सकिने माध्यमांना सांगितले की, “अंतिम संस्कारचे आयोजन दोन किंवा तीन आठवड्यांमध्ये केले जाणार आहे आणि त्याचे सर्व नियोजन एमसीजीवर केले जाणार आहे. वाॅर्नचे कुटूंब त्याचे पार्थिव थायलंडवरुन घरी आणण्याची वाट पाहत आहे. वाॅर्नचे थायलंडच्या कोह समुई द्वीपवर शुक्रवारी (४ मार्च) हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.”

माध्यमातील वृत्तांनुसार, प्रधानमंत्री स्कॉट मौरीसन आणि व्हिक्टोरियाचे प्रधानमंत्री डेनियल एंड्रयूज हे सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. तारखेवरुन वाॅर्नच्या कुटूंबीयांशी बोलणे सुरु आहे. एमसीजी वाॅर्नचे आवडते मैदान आहे. त्याने १९९४ मध्ये या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत हॅट्रीक केली होती.

एमसीजी मैदानाच्या बाहेर वाॅर्नचा पूतळा आहे. त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर या पुतळ्याखाली चाहत्यांची गर्दी झाली होती. या मूर्तीला कोणाी फूल वाहत होते तर कोणी सिगारेट, बियर ठेवत त्याला श्रद्धांजली वाहत होते. एमसीजी स्टेडियमचे नाव बदलून एसके वाॅर्न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आहे. वाॅर्नच्या मृत्यूच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक रॉड मार्शचे सुद्धा निधन झाले होते. पश्चिम ऑस्ट्रेलियन सरकारने अंतिम संस्कार राजकीय सन्मानाने करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अरर! लाईव्ह सामन्यात पाकिस्तानी खेळाडूची पँट फाटल्याने झाली फजिती, नेटकरी घेतायेत मजा

दिल ये जिद्दी है! आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी चेन्नईच्या दीपक चाहरचा कसून सराव, व्हिडिओ व्हायरल

Video: थाला इज बॅक! आयपीएल २०२२ पूर्वी धोनीची तुफानी फटकेबाजी, एका हाताने ठोकला षटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---