---Advertisement---

अरर! लाईव्ह सामन्यात पाकिस्तानी खेळाडूची पँट फाटल्याने झाली फजिती, नेटकरी घेतायेत मजा

On: मंगळवार, मार्च 8, 2022 11:22 AM
Shan-Masood
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उभय संघात सध्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीमध्ये खेळला जात आहे. हा सामना जवळपास अनिर्णित होण्याच्या मार्गावर आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघ २७ धावांनी आघाडीवर आहे. दरम्यान सामन्याच्या चौथ्या दिवशी एक घटना पाहायला मिळाली, ज्यामध्ये बदली खेळाडूच्या रूपात मैदानात आलेल्या शान मसूदची पँट फाटली होती. सोशल मीडियावर चाहते या प्रसंगाची मजा घेत आहेत.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीवेळी १२३ व्या षटकात ही घटना घडली. या षटकात पाकिस्तानचा नौमान अली (Nauman Ali) गोलंदाजी करत होता. षटकातील पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज एलेक्स कॅरीने (Alex Carey) रिवर्स स्वीप शॉट खेळला. चेंडू पॉइंट्सच्या दिशेने गेले. कॅरीने मारलेला हा शॉट रोखण्यासाठी शान मसूद (Shan Masood) धावला. चेंडूला आडवण्याच्या प्रयत्नत मसूद सीमारेशेजवळ लावलेल्या बॅनर्सला घासत पुढे गेला. जेव्हा तो पुढे उभा राहिला, तेव्हा दिसले की, त्याची पॅंट फाटली आहे. याच पार्श्वभूमीवर नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत, काहींनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर शेवटच्या दिवशी देखील पहिलाच डाव खेळला जात आहे. पहिल्या डावात पाकिस्तानने सलामीवीरांच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर ४७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७ विकेट्सच्या नुकसानावर ४४९ धावा केल्या आहेत.

यजमान पाकिस्तानसाठी सालामीवीर इमाम उल हकने १५७, तर एजहर एलीने सर्वाधिक १८५ धावा केल्या. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाचे शतक अवघ्या ३ धावांना हुकले, तो ९७ धावा करून बाद  झाला. डेविड वॉर्ननेर ख्वाजाची साथ देत ६८ धावा केल्या. त्यानंतर मार्नश लॅब्यूशेननेही ९० धावांची मोठी खेळी केली. एकंदरित पाहता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---