टी20 विश्वचषक 2024 येत्या 2 जूनपासून सुरु होणार आहे. यावर्षीचा टी20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशात खेळाला जाणार आहे. आयसीसीच्या या टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच 20 संघांनी सहभाग नोंदवला आहे. परंतु या 20 संघांपैकी पाकिस्तान एकमात्र असा संघ आहे की, त्यांनी अद्दाप टी20 विश्वचषकाच्या संघाची घोषणा केली नाही. सध्या पाकिस्तान इंग्लंडसोबत होणाऱ्या 4 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे.
आयसीसीच्या (ICC) नियमानुसार सर्व संघांनी स्पर्धा चालू होण्यापूर्वी एक महिना आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली पाहिजे. जेणेकरुन संघात काही बदल करायचा असेल, तर आयसीसी परवानगी देते. टी20 विश्वचषक 2024 यामध्ये सर्व संघांना (1 मे) पर्यंत संघांची घोषणा करणे भाग होते. तर (25 मे) पर्यंत संघात काही बदल करण्यासाठी त्यांना वेळ आहे. परंतु दिलेली तारीख समाप्त झाल्यानंतर संघात काही बदल हवा असल्यास आयसीसीची परवानगी घ्यावी लागते.
आता आयसीसीनं दिलेली दुसरी तारीख (25 मे) जवळ येत आहे. परंतु पाकिस्ताननं अजूनही त्यांचा संघ घोषित केला नाही. पाकिस्तान संघ यावेळी काही बदल करण्याच्या स्थितीत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यावेळी बरेच बदल केलेले पाहायला मिळाले आहेत. शाहीन आफ्रिदी कडून कर्णधार पद काढून घेतले. परंतु पुन्हा बाबर आझमकडे कर्णधार पदाची जबाबदरी सोपवली. तर या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनं पुनरागमन केलं आहे. त्यामुळे हा संघ मजबूत दिसणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं गैरी कस्टर्न यांची संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गैरी कस्टर्न भारताचे प्रशिक्षक असताना भारताने 2011चा विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाला यांच्या अनुभवाचा खूप फायदा होणार आहे. परंतु पाकिस्तान संघानं टी20 विश्वचषकासाठी 15 सदस्यांची घोषणा केली पाहिजे.