न्यूझीलंडनंतर भारताचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यात रोहित शर्मा याला विश्रांती दिली होती, आता तो बांगलादेशच्या दौऱ्यात पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) पहिला वनडे सामना रविवारी (4 डिसेंबर) शेर ए बांगला स्टेडिय, ढाका येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी खेळला जाणार आहे.
या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या बॅटमधून तीन धावा निघताच तो भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांना वनडेत सर्वाधिक धावा करण्यात मागे टाकेल. अझरुद्दीन यांनी भारताकडून 334 वनडे खेळले आहेत. त्यातील 308 डावांमध्ये त्यांनी 36.92च्या सरासरीने 9378 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 7 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहितने आतापर्यंत भारताकडून 233 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 48.58च्या सरासरीने 9376 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 29 शतके आणि 45 अर्धशतके केली आहेत. हा विक्रम करताच तो भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा सहावाच फलंदाज ठरेल.
वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दिग्गज सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी आहे. त्याने 1989 ते 2012च्या दरम्यान 463 सामने खेळताना 44.83च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत. यामध्ये 49 शतके आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. 12344 धावांसह दुसऱ्या स्थानी विराट कोहली आहे. त्याने 2008 ते आतापर्यंत 262 सामने खेळताना 43 शतके आणि 64 अर्धशतके केली आहेत. या प्रकारामध्ये त्याची सरासरी बाकी भारतीय खेळाडूंपेक्षा उत्तम आहे. त्याने 57.68च्या सरासरी आणि 92.83च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
या यादीत शिखर धवन दहाव्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 164 सामने खेळले असून त्यामध्ये 6775 धावा केल्या आहेत. Rohit has a chance to break the record of former Indian captain Mohammad Azharuddin BANvIND First ODI
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! फुटबॉल दिग्गज पेलेंच्या तब्येतीत सुधारणा, इंस्टाग्रामवर शेअर केली भावूक पोस्ट
मेस्सीने रचला इतिहास! सामना संपण्यास 1 मिनिट असताना मार्टिनेझच्या भन्नाट सेव्हने अर्जेंटिना सुपर 8मध्ये






