---Advertisement---

गाबा मैदानावर आतापर्यंत हे 4 भारतीयचं शतक करण्यात यशस्वी, शेवटची सेंच्युरी 10 वर्षापूर्वी आलेली

On: मंगळवार, डिसेंबर 10, 2024 9:09 AM
india gaba test win
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतीय संघाने पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. आता सर्वांचे लक्ष गब्बा कसोटी सामन्याकडे लागले आहे. जिथे टीम इंडियाने 2021 मध्ये कसोटी सामना जिंकून इतिहास रचला. आतापर्यंत केवळ एमएल जयसिम्हा, सुनील गावस्कर, सौरव गांगुली आणि मुरली विजय या चार भारतीय फलंदाजांना गाब्बाच्या मैदानावर शतके झळकावता आली आहेत.

गाबा मैदानावर भारताने पहिले कसोटी शतक 1968 साली झळकावले होते. ज्यात एमएल जयसिम्हाने 101 धावांची खेळी केली होती. मात्र या सामन्यात मात्र टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात अपयश आले. त्यानंतर 1977 मध्ये सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच मैदानावर 113 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारतीय संघ हा सामना 16 धावांनी हरला.

सौरव गांगुलीने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा येथे 144 धावांची इनिंग खेळली होती. हा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर 2014 मध्ये मुरली विजयने याच मैदानावर 144 धावांची इनिंग खेळली होती. पण तरीही टीम इंडियाचा विजय झाला नव्हता. गाबा मैदानावर शतके झळकावणारे चारही भारतीय खेळाडू निवृत्त झाले आहेत. 2014 नंतर एकाही भारतीय फलंदाजाला गाब्बाच्या मैदानावर कसोटी शतक झळकावता आलेले नाही.

भारतीय संघाने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा मैदानावर एकूण 7 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी केवळ एकच सामना जिंकू शकला आहे. टीम इंडियाला पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये गाबा मैदानावर कसोटी सामना जिंकलेला. ज्यात रिषभ पंतने 89 धावांची खेळी खेळून सर्वात मोठा हिरो असल्याचे सिद्ध केले आणि त्याच्यामुळेच टीम इंडिया सामना जिंकण्यात यशस्वी ठरली.

गाबा येथे सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज:

एमएल जयसिम्हा- 175 धावा
मुरली विजय-171 धावा
अजिंक्य रहाणे- 152 धावा
सौरव गांगुली- 144 धावा
चेतेश्वर पुजारा- 142 धावा

हेही वाचा-

केएल राहुलच्या जागी रोहितने सलामी करावी, या दोन दिग्गजांचा भारतीय कर्णधाराला सल्ला
नितीश रेड्डीने मोडला सेहवागचा विश्वविक्रम, फक्त 2 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत केला मोठा चमत्कार
SMAT 2024; या 8 संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक, पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---