इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा उर्वरित हंगाम येत्या सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेसाठी खेळाडूंचा मोठा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये संघांना फक्त ४ खेळाडूंना संघात कायम करता येणार आहेत. हा लिलाव होण्यापूर्वी सनरायजर्स हैदराबाद संघाची सहमालकीन काव्या मारन ही सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. काय आहे यामागचे कारण? चला जाणून घेऊया.
आयपीएल २०२२ मध्ये होणाऱ्या लिलावात सर्व संघांना ४ खेळाडूंना कायम करता येणार आहे. ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचताच चाहत्यांनी काव्या मारनला रिटेन करण्याची मागणी करायला सुरुवात केली आहे. सनराइजर्स हैदराबाद संघात डेव्हिड वॉर्नर, राशिद खान आणि केन विलियमसन सारखे दिग्गज खेळाडू आहेत. डेव्हिड वॉर्नर या संघातील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. तर राशिद खानने देखील टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. तसेच केन विलियमसनला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. अशातच सनराइजर्स हैदराबाद संघ कुठल्या खेळाडूला काढणार आणि कोणाला रिटेन करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अशातच चाहत्यांनी मजेशीर ट्विट करत लिहिले की, ‘केन आणि वॉर्नरबाबत काही माहित नाही. परंतु, सनराइजर्स हैदराबाद संघाने सह संघमालकीन पदावर काव्या मारनला रिटेन करायला हवे.’ (only 4 players can retained in ipl 2022 auction fans says retain kaviya maaran as co owner of srh )
Don't know about Warner or Kane, but SRH should retain Kaviya Maran as owner 😍
— H (@_offthemark_) July 5, 2021
https://twitter.com/Marshall_140/status/1411918485383356418?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1411918485383356418%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fcricket%2Fipl-2022-only-4-players-can-be-retained-in-mega-auction-fans-said-srh-should-retain-kaviya-maran-as-owner%2F935534
मुंबई इंडियन्स संघ कोणाला करणार रिटेन?
मुंबई इंडियन्स संघात कोण कायम राहणार याबद्दलही चाहत्यांनी मते व्यक्त केली आहेत. चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रेयनुसार, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कायरोन पोलार्ड हे मुंबई इंडियन्स संघात कायम राहतील. तर चौथ्या क्रमांकासाठी हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोन्ही खेळाडूंचे नाव पुढे आले आहे.
https://twitter.com/Im_Perfect45/status/1411924690474569732?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1411924690474569732%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fcricket%2Fipl-2022-only-4-players-can-be-retained-in-mega-auction-fans-said-srh-should-retain-kaviya-maran-as-owner%2F935534
Don't Worry Cskians We have Jaddu#ipl2022 pic.twitter.com/ScgDBDFwPA
— Lord Shardul Fanatic (@lordshardul07) July 5, 2021
चेन्नई सुपर किंग्स संघात कोण राहणार कायम?
या संघात रवींद्र जडेजाचे नाव सर्वात पुढे आहे. त्यानंतर एमएस धोनी, फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांचे नाव घेतले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यासह आयपीएलमधूनही बाहेर, पाहा कधीपर्यंत राहणार क्रिकेटपासून दूर?
टी२० विश्वचषकापुर्वी अफगानिस्तान संघात मोठा बदल, अव्वल फिरकीपटू राशिद बनला ‘नवा कर्णधार’
निष्काळजीपणाने वाढवली चिंता! इंग्लंडच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव, तरीही विराटसेनेच्या सुट्ट्या सुरूच