भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केल्यामुळे अनिर्णीत राहिला होता. तर मालिकेतील दुसरा सामना येत्या १२ ऑगस्ट पासून क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात मोठी खेळी केली तर तो दिग्गज भारतीय फलंदाजांना मागे टाकू शकतो.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या क्रिकेटच्या तीनही स्वरूपात अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु गेल्या ९ कसोटी सामन्यातील १५ डावात त्याला एकही शतक झळकावण्यात यश आले नाही. त्यामुळे लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर तो शतक झळकावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या मैदानावर माजी भारतीय फलंदाज सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांनाही शतक झळकावण्यात यश आले नव्हते. विराटने लॉर्ड्सच्या मैदानावर एकूण ४ डावात ६५ धावा केल्या आहेत. तर २५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
सचिन आणि गावसकर देखील शतक झळकावण्यात अपयशी
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांना देखील शतक झळकावण्यात अपयश आले होत. सुनील गावसकरांची लॉर्ड्सच्या मैदानावरील कामगिरी पहिली तर, त्यांनी १० डावात ३४० धावा केल्या आहेत. तर सचिनला या मैदानावर एकही अर्धशतक झळकावता आले नाही. तसेच चेतेश्वर पुजाराने गेल्या ३२ डावात २७.६४ च्या सरासरीने ८५७ धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याने गेल्या ४ डावात ८९ धावा केल्या आहेत. त्याला देखील एकही अर्धशतक झळकावता आले नाही.
रहाणेला शतक झळकावण्यात आले यश
इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघात अजिंक्य रहाणे हा एकमेव खेळाडू आहे ज्याने लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावले आहे. २०१४ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत १०३ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ९५ धावांनी विजय मिळवला होता. (Virat Kohli can score a century in lords test against England,Indian captain could not complete a century for two years)
वेंगसरकर यांनी केली होती शतकांची हॅट्रिक
माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी लॉर्ड्सच्या मैदानावर सलग ३ शतक झळकावले होते. त्यांनी १९८३ मध्ये १५७, १९८६ मध्ये १२६ आणि १२६ धावांची खेळी केली होती.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: लॉर्ड्स कसोटीतून शार्दुल ठाकूर भारतीय संघातून बाहेर, ‘हे’ आहे कारण
पाकिस्तानचे पानिपत करणारा ‘तो’ गोलंदाज लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडच्या ताफ्यात