क्रिकेट विश्वात असे अनेक विक्रम आहेत, जे आश्चर्यचकित करणारे आहेत. काही विक्रम असे असतात जे नशीबामुळे बनलेले असतात. अशाच एका विक्रमाची नोंद आहे. बाप- लेकांची क्रिकेटर जोडी लाला अमरनाथ आणि सुरेंदर अमरनाथ यांच्या नावावर. माजी भारतीय क्रिकेटर लाला अमरनाथ यांचा सुरेंदर अमरनाथ हा मुलगा आहे.
अमरनाथ पिता-पुत्र जोडीने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक अनोखा विक्रम नोंदविला होता. ज्याला तोडणे कठीण आहे. लाला अमरनाथ (Lala Amarnath) आणि सुरेंदर अमरनाथ (Surindar Amarnath) जगातील एकमेव पिता-पुत्र जोडी आहे, जीने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. लाला अमरनाथ यांनी पदार्पणात शतकी खेळी १९३३ साली इंग्लंडविरुद्ध मुंबई येथे केली होती. त्याचा मुलगा सुरिंदर अमरनाथने १९७६ साली ४३ वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने जोरदार शतक ठोकलं होतं.
सुरेंदर अमरनाथने न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंडमध्ये कसोटी पदार्पण केले. सुरेंदरने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 10 सामने खेळले आणि यावेळी त्याने 550 धावा केल्या. यात 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकावली होती.
तर सुरेंदर अमरनाथचे वडील लाला अमरनाथने आपल्या कसोटी कारकीर्दीत 24 कसोटी सामने खेळले आणि त्यांनी १ शतक आणि ४ अर्धशतकीय खेळीद्वारे 878 धावा जमविल्या. लाला अमरनाथ हे भारताचे पहिले क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी भारताकडून पहिले कसोटी शतक केलं आहे.
महत्त्वाचे म्हणजे लाला अमरनाथ यांना तीन मुले आहेत. आणि तिघेही क्रिकेटपटू होते. एकाचे सुरेंदर असे नाव असून दुसर्या मुलाचे नाव मोहिंदर (Mohindar) आहे, तर तिसर्या मुलाचे नाव राजेंद्र (Rajendra) आहे. मोहिंदर हा भारताकडूनही खेळला आहे आणि एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. १९८३ विश्वचषकामध्ये मोहिंदर हा भारतीय संघाचा सदस्य होता आणि भारताने प्रथमच विश्वचषक जिंकण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याच वेळी राजेंद्र अमरनाथबद्दल बोलायचं झालं, तर त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्या बात है… शंभराव्या सामन्यात या खेळाडूंनी घातली शतकाला गवसणी
-अरे माझी कोरोना टेस्ट तर निगेटिव्ह; पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचे खळबळजनक ट्विट
-पुढच्या वर्षी भारतात येणार पाकिस्तान टीम, पीसीबीने भारताकडे मागितलं लिखीत आश्वासन





