---Advertisement---

‘या’ भारतीयांचा कसोटी पदार्पणात नुसता धुराळा; केला ३ विकेट्स आणि अर्धशतक करण्याचा पराक्रम

On: रविवार, जानेवारी 17, 2021 3:00 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३६९ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाच्या या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या डावात भारतीय संघाची वरची आणि मधली फळी फेल ठरली. परंतु खालच्या फळीत फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. यासह एक खास त्याच्या नावे झाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना या पदार्पणवीराने ३ विकेट्स घेतल्या होत्या. ३१ षटके गोलंदाजी करताना ८९ धावा देत त्याने हा पराक्रम केला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ हा त्याचा पहिला शिकार बनला. तर पुढे कॅमरॉन ग्रीन आणि नॅथन लायन यांना त्याने त्रिफळाचीत केले.

पुढे फलंदाजी करताना सुंदरने १४४ चेंडूत ४३.०६च्या स्ट्राईक रेटने ६२ धावा केल्या. दरम्यान त्याने १ षटकार आणि ७ चौकार ठोकले. अखेर मिचेल स्टार्कने कॅमरॉन ग्रीनच्या हातून त्याला झेलबाद केले.

अशाप्रकारे पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ३ विकेट्स घेणे आणि सोबतच ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा खास विक्रम सुंदरच्या नावावर झाला आहे. त्याच्याव्यतिरिक्त सक्रिय खेळाडूंमध्ये हनुमा विहारी यानेही हा पराक्रम केला आहे. २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करत त्याने ३ विकेट्स आणि अर्धशतक केले होते. माजी भारतीय दिग्गजांमध्ये सौरव गांगुली (१९९६), दत्तू फाडकर (१९४७) आणि अमर सिंग (१९३२) यांनी हा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे या सर्वांनी मायदेशाबाहेर हे कारनामे केले आहेत.

ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावाखेर ३३ धावांनी आघाडीवर

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मार्कस हॅरीस आणि डेविड वॉर्नर हे सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : भारताच्या शेपटाचा ऑसी गोलंदाजांना तडाखा, भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात

गोलंदाजीनंतर फलंदाजीतही शार्दुलचा दे घुमा के! इरफान-अश्विनच्या ‘त्या’ विक्रमाची केली बरोबरी

सुटला असता ना भावा! पहिल्यांदा चेंडू हातून निसटला तरीही स्मिथने पकडला अप्रतिम झेल, बघा व्हिडिओ   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---