वर्ष २०२१ समाप्त व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कोरोनाचा फटका बसला होता. परंतु, २०२१ मध्ये परिस्थिती आटोक्यात आली आणि यावर्षी अनेक मोठ-मोठ्या स्पर्धा पार पडल्या. ज्यामध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World test championship final) अंतिम सामन्याचा आणि टी२० विश्वचषक २०२१ (ICC T20 world cup) स्पर्धा पार पडली. दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसीतर्फे (ICC) पुरस्कार दिला जातो. ज्याची घोषणा वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते. यावेळी भारतीय संघाच्या पदरी निराशा पडली आहे. कारण केवळ २ खेळाडूंना नामांकन मिळालं आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत केवळ २ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. (Only two Indian players received nominations for ICC awards) ज्यामध्ये भारतीय पुरुष संघातून दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याचा (R Ahswin) समावेश आहे. तर भारतीय महिला संघातून सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना हिचा (Smriti Mandhana) समावेश आहे. या खेळाडूंव्यक्तिरिक्त कुठल्याच भारतीय खेळाडूला नामांकन मिळालं नाहीये.
भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करणाऱ्या स्मृती मंधानाला गुरुवारी (३० डिसेंबर) तीन क्रिकेटपटूंसह ‘आयसीसी महिला टी२० प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. ज्यामध्ये स्म्रीती मंधानासह इंग्लंड संघाची खेळाडू टॅमी ब्युमॉन्ट, नॅट सायव्हर आणि आयर्लंडची गॅबी लुईस यांचा समावेश आहे. तर पुरुषांमध्ये ‘आयसीसी पुरुष टी२० प्लेयर ऑफ द इयर’ साठी मोहम्मद रिजवान, वनिंदू हसरंगा, मिचेल मार्श आणि जोस बटलर यांना नामांकन मिळाले आहे.
भारतीय संघातील दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनला कसोटी क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. यामध्ये आर अश्विनसह, इंग्लंडचा कर्णधार जो रूट, श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसन यांचा समावेश आहे. या पुरस्कारांची घोषणा १७ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान केली जाणार आहे.
अधिक वाचा – ‘या’ कारणामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार पराभूत होऊनही आहे खुश, वाचा काय म्हणाला..
तसेच आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूसाठी बांगलादेशचा शाकिब अल हसन, पाकिस्तानचा बाबर आजम, दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांची निवड झाली आहे, तर महिला वनडे खेळाडूंच्या यादीत आफ्रिकेच्या लिझेल लीचे नाव आहे. तसेच इंग्लंडची टॅमी ब्युमॉन्ट, वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज आणि पाकिस्तानची फातिमा सना यांची निवड करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
तब्बल १ तास स्टीव्ह स्मिथ अडकला लिफ्टमध्ये, लॅब्युशेनने फटीतून दिले खायला, पाहा व्हिडिओ
केएल राहुलने सांगितली राज की बात! फलंदाजीत ‘हा’ बदल केल्याने मिळाले यश
हे नक्की पाहा: