यावर्षी विश्वचषक 2023 स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच, भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंता वाढल्या आहेत. खरं तर, संघाचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्यावर शंका आहे.
झालं असं की, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) संघात खेळल्या गेलेल्या चौथ्या वनडे सामन्यादरम्यान फलंदाजी करताना ट्रेविस हेड (Travis Head) याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. आफ्रिकेचा गोलंदाज गेराल्ड कोएट्जी (Gerald Coetzee) याचा आखुड टप्प्याचा चेंडू हेडच्या डाव्या हाताच्या ग्लोव्ह्जवर जाऊन लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज वेदनेने विव्हळू लागला. त्यानंतर 3 चेंडूतच त्याने मैदान सोडले.
तो रिटायर हर्ट होऊन तंबूत परतला आणि फलंदाजीसाठी पुन्हा आला नाही. खरं तर, हेडने या सामन्यात 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 17 धावा केल्या होत्या. मात्र, त्याच्या दुखापतीमुळे आता ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंता वाढवल्या आहेत. अशात हेड वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Travis Head set to miss the first half of the 2023 World Cup.
A massive setback for Head, he was in a purple patch! pic.twitter.com/HKqRwkGTY1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2023
प्रशिक्षकाची प्रतिक्रिया
ट्रेविस हेड याच्या दुखापतीवर माध्यमांशी बोलताना प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनल्ड यांनी मोठी माहिती दिली. त्यांनी म्हटले, “चांगली बाब ही आहे की, सध्या त्याला सर्जरीची गरज नाहीये. फॉलो-अप स्कॅनमध्ये पुष्टी झाली आहे की, फ्रॅक्चरमध्ये एक जॉईंट होते. आम्ही फक्त याबाबत विचार करू की, तो विश्वचषकातील सुरुवातीचे सामने खेळू शकेल की नाही.”
खरं तर, ऑस्ट्रेलिया संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे आधीपासूनच दुखापतग्रस्त आहेत. त्यामध्ये पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क आणि कॅमरून ग्रीन यांचा समावेश आहे. अशात ट्रेविस हेड या यादीत नव्याने सामील झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंता वाढल्या आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाला आशा आहे की, हेड लवकरच फिट होऊन संघात परतेल. (opener batsman travis head ruled out of first half of world cup coach andrew mcdonald confirms read here)
महत्वाच्या बातम्या-
भारताने जिंकला Asia Cup, तरीही ICC Rankingsमध्ये पाकिस्तानच टॉपर कसा? घ्या जाणून
इशानने घेतला पंगा, मग विराटनेही दाखवला इंगा; Asia Cup Champion बनल्यानंतर स्टार खेळाडूंचा Video Viral