---Advertisement---

OTD: टीम इंडियाचा स्वप्नवत विजय! रोहितच्या नेतृत्वाखाली आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला

---Advertisement---

आजच्या दिवशी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बारबाडोसमध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. तब्बल 11 वर्षांनंतर भारताने आयसीसी स्पर्धा जिंकली. याआधी भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तसेच 2007 नंतर भारताचा हा पहिलाच टी20 वर्ल्ड कप विजेतेपद ठरला.

फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली, सूर्यकुमार यादव झळकले, मात्र संपूर्ण स्पर्धेत कॅप्टन रोहित शर्माने केलेली कामगिरी ही एका खऱ्या योद्ध्याचीच होती.

रोहित शर्मा टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक 257 धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांची सर्वाधिक वैयक्तिक खेळी केली. याशिवाय त्याने सर्वाधिक स्ट्राइक रेट (156.70), सर्वाधिक अर्धशतकं (3), चौकार (24) आणि षटकार (15) ठोकले. रोहित तिन्ही सामन्यांमध्ये भारतासाठी टॉप स्कोअररही ठरले.

रोहित शर्मा ICC ट्रॉफी जिंकवणारा भारताचा चौथा कर्णधार ठरला. त्याआधी 1983 मध्ये कपिल देवने भारताला वनडे वर्ल्ड कप जिंकवला होता, 2002 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेसोबत संयुक्त चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने सुवर्णकाळ अनुभवला – 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माची ट्रॉफी जिंकण्याची भूक तिथेच थांबली नाही. 2025 मध्ये त्याने न्यूझीलंडला पराभूत करत भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकवली. आता टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या हिटमॅनची नजर 2027 वनडे वर्ल्ड कपवर असेल.

जर रोहित शर्मा कर्णधार म्हणून हा वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी ठरला, तर तो एमएस धोनीच्या बरोरबरीला पोहचेल कारण धोनी अद्यापपर्यंत टी20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी – हे तिन्ही ICC ट्रॉफी जिंकणारे एकमेव कर्णधार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---