विश्वचषक 2023 चा 12 वा सामना 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये भारताने दणदणीत विजय नोंदवला. या शानदार सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून पराभव केला होता. या विजयानंतर भारत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सामन्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी विविध वक्तव्ये केली. पण मिकी आर्थरच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली, जी भारतीय चाहत्यांना अजिबात आवडली नाही. त्याच्या वक्तव्यामुळे संतापलेल्या एस. श्रीशांतने एक मोठं वक्तव्य केलं आहे.
स्पोर्ट्सकीडाशी बोलताना श्रीशांत (S Sreesanth) म्हणाला की, “मिकी आर्थर (Mickey Arthur) म्हणाला की, आम्ही अंतिम फेरीत पाहू. भाऊ तुला फायनल बघावी लागणार नाही. विश्वचषकात पाकिस्तान संघ भारताला पराभूत करू शकेल, असे मला वाटत नाही. त्यांच्याकडे ज्या प्रकारचा संघ आहे, ते पाहुण आम्ही कधीही हरू शकणार नाही. आमचा सी संघही पाकिस्तानच्या या संघाला हरवेल. तुम्ही आयपीएल प्लेइंग इलेव्हन बनवा जी सध्या कुठेही खेळत नाही. तीही पाकिस्तानचा पराभव करेल.”
काय म्हणाला होता मिकी आर्थर
भारत-पाक सामन्यानंतर मिकी म्हणाला होता की, भारतीय क्रिकेट संघ खूप चांगला आहे. मला वाटते की राहुल द्रविड आणि रोहित शर्मा संघाचे नेतृत्व चांगले करत आहेत. मी फायनलमध्ये त्यांना पुन्हा भेटण्यास उत्सुक आहे.” आर्थरच्या याच वक्तव्यावर श्रीशांतने प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा संचालक मिकी आर्थर भारताविरुद्धच्या पराभवानंतर पुढे म्हणाला होता की, “खरे सांगायचे तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा आयसीसीच्या कार्यक्रमासारखा वाटत नाही. जणू काही द्विपक्षीय मालिकेचा हा सामना खेळला जात आहे. हे पूर्णपणे बीसीसीआयने आयोजित केलेले दिसते. मी दिल-दिल पाकिस्तान पुन्हा-पुन्हा मायक्रोफोनवरून ऐकले नाही. या गोष्टींचा सामन्याच्या निकालावर परिणाम होतो.”
भारताचा विश्वचषक 2023 मधील चौथा सामना 19 ऑक्टोबरला पुणे येथे बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारत हा सामना जिंकुन गुणतालिकेत पहिलं स्थान मजबुत करण्यााच्या तयारीने मैदानात उतरेल, तर बांगलादेश दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरेल.
Our C team also lost to Pakistan Sreesanth sensational reply to Mickey Arthur
हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण