---Advertisement---

‘मिशन दक्षिण आफ्रिके’साठी रहाणे, पंतने कसली कंबर; स्पेशल गुरूकडून घेतले फलंदाजीचे धडे

Ajinkya-Rahane
---Advertisement---

यावर्षी कसोटीमध्ये चांगलं प्रदर्शन करू न शकलेल्या अजिंक्य रहाणे याने (Ajinkya Rahane) दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी (India Tour Of South Africa) एका माजी क्रिकेटपटूचा सल्ला घेतला आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी १६ डिसेंबरला रवाना होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेटपटू कसून सराव करत आहेत.

अजिंक्य रहाणेने माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या (Vinod Kambli) मार्गदर्शनाखाली नेट्समध्ये कसून सराव केला. तसेच माजी उपकर्णधारासोबत यष्टिरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) सुद्धा होता. त्यालासुद्धा विनोद कांबळीने काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघांमधील पहिला कसोटी सामना (South Africa vs India 1st Test) २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येईल.

यावर्षी जानेवारीपासून रहाणे कसोटी सामन्यांत चांगलं प्रदर्शन करून धावा नाही करू शकला. त्याची सरासरी फक्त १७ ची आहे. यामुळेच त्याच उपकर्णधारपदसुद्धा गेलं आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) पदार्पणानंतर रहाणेला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवणंसुद्धा कठीण झालंय.

त्यामुळे रहाणेने विनोद कांबळीच्या मार्गदर्शनात नेट्समध्ये सराव केला ज्याचे फोटो विनोद कांबळीने त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केले होते. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, “अजिंक्य आणि रिषभला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सरावासाठी मदत करताना आनंद झाला. दक्षिण आफ्रिकेतल्या परिस्थितीबद्दलसुद्धा त्यांना सांगितले. माझ्याकडून दोघांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी शुभेच्छा. ख्रिस्तियानोला देखील थोडं फार शिकायला मिळालं.”

ख्रिस्तियानो विनोद कांबळीचा मुलगा आहे आणि तोसुद्धा सरावादरम्यान उपस्थित होता. त्याने भारतीय संघाच्या खेळाडूंसोबत मजा केली आणि फोटोसुद्धा काढले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कांबळीच्या टिप्स अजिंक्य आणि रिषभच्या किती उपयोगी पडतात हे बघण्यासारखं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---