अहमदाबाद। भारताने गुरुवारी (२५ फेब्रुवारी) इंग्लंड विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला. यासह भारतीय संघाने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. असे असले तरी या सामन्यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या डिआरएस रिव्ह्यूने एक वाद निर्माण केला आहे.
नक्की काय झाले?
इंग्लंडचा दुसरा डाव सुरु असताना १५ व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील टाकलेल्या चौथ्या चेंडूवर भारताने जो रुट पायचीत झाला म्हणून अपील केले. यावेळी मैदानावरील पंचांनीही रुट बाद असल्याचा निकाल दिला. त्यावेळी रुट नॉन-स्ट्रायकरला उभ्या असलेल्या बेन स्टोक्सबरोबर डीआरएस रिव्ह्यू घ्यायचा की नाही याबाबत बराच वेळ चर्चा करताना दिसला. अखेर शेवटच्या सेंकदात त्याने रिव्ह्यूची मागणी केली.
या रिव्ह्यूमध्ये दिसले की चेंडू जेव्हा पॅडच्या जवळ होता. त्याचवेळी रुटची बॅटही पॅडच्या जवळच होती. त्यामुळे चेंडू नक्की आधी बॅटला लागला की पॅड लागला याबाबत गोंधळ होत होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी विविध बाजूंनी आधी चेंडू बॅटला लागला की पॅडला लागला हे तपासले. मात्र, याबाबत ठोस निकाल हाती लागत नव्हता. एका बाजूने चेंडू आधी पॅडला लागल्याचे दिसत होते. तर दुसऱ्या बाजूने चेंडू आधी बॅटला लागल्याचे दिसत होते. पण अखेर तिसऱ्या पंचांनी रुटच्या बाजूने निकाल दिला, त्यामुळे रुटला जीवनदान मिळाले.
पण रुटला या जीवनदानाचा फारसा उपयोग झाला नाही. त्याला १९ व्या षटकात अक्षरनेच पायचीत केले. त्यामुळे रुटला १९ धावा करुन माघारी परतावेच लागले.
सोशल मीडियावर चर्चा
रुटला १५ व्या षटकात डीआरएस रिव्ह्यूनंतर नाबाद दिल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. अनेक चाहत्यांनी डीआरएस रिव्ह्यूवर तसेच तिसऱ्या पंचांवर टीका केली. तर अनेक चाहत्यांचे म्हणणे होते की पॅडला चेंडू आधी लागला होता आणि रुट बाद होता. तर काहींनी म्हटले की चेंडू आणि की पॅड आधी हे न सुटलेलं रहस्य आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1364908444642287622
https://twitter.com/bhogleharsha/status/1364910587638030342
https://twitter.com/andileluck19/status/1364908020367515652
https://twitter.com/_vishaaaaal_/status/1364909090040733700
https://twitter.com/urmilpatel30/status/1364908707461689347
https://twitter.com/sachinjakhmola3/status/1364911232311054338
https://twitter.com/Soham718/status/1364909733195354113
https://twitter.com/dhairya_c31/status/1364908094371733510
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1364908071126851587
https://twitter.com/UtkarshPant3/status/1364909295314161664
https://twitter.com/magnum_mantis/status/1364909412847022084
इंग्लंडचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
या सामन्यात भारताने विजय मिळवल्याने इंग्लंडचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्येच स्पर्धा आहे. न्यूझीलंडने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आधीच प्रवेश केला आहे.
त्यामुळे आता अंतिम सामन्यात भारताला जर न्यूझीलंडशी दोन हात करायचे असेल तर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-१ किंवा ३-१ अशा फरकाने जिंकावीच लागणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियालाही अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची संधी आहे. जर इंग्लंडने भारताविरुद्धचा कसोटी मालिकेतील उर्वरित सामना जिंकला आणि मालिका २-२ अशा फरकाने बरोबरीत सोडवली तर ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
दिवस-रात्र कसोटीत अक्षर पटेलने इंग्लंड संघाला दाखवले चांदणे, ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच गोलंदाज
विक्रमादित्य अश्विन! सगळ्यात जलद ४०० बळी घेणारा ठरला विश्वातील दुसरा गोलंदाज
व्हिडिओ : अक्षर पटेलच्या फिरकी जाळ्यात अडकला इंग्लिश सलामीवीर, रिषभ पंतने घेतला शानदार झेल