इंडियन प्रीमियर लीग २०२२ ही स्पर्धा सध्या भारतात सुरू आहे. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. यात जम्मू आणि काश्मीरच्या उमरान मलिक याचाही समावेश आहे. त्याने त्याच्या वेगाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्याने गेल्यावर्षी आयपीएलमध्येच आपल्यातील वेगवान गोलंदाजीची क्षमता दाखवून दिली होती. त्यानंतर आता आयपीएलच्या २०२२ हंगामात तो सातत्याने ताशी १५० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी कौतुकाची उधळण केली. मात्र, असे असले तरी भारताचा माजी क्रिकेटपटू आरपी सिंग याने त्याचे कान टोचले आहेत.
सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा उमरान (Umran Malik) हा आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) सर्वात वेगवान चेंडू (fastest ball of IPL 2022) टाकणारा गोलंदाज आहे. पण असे असले तरी तो बऱ्याचदा धावांची खैरातही वाटताना दिसत आहे. त्याने नुकतेच दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४ षटकांत ५२ धावा दिल्या. त्यापूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धही ४ षटकात ४८ धावा दिल्या होत्या. त्याचमुळे आरपी सिंग (RP Singh) म्हणाला आहे की, त्याला वेगाबरोबरच विकेट्सही घ्याव्या लागणार आहेत.
आरपी सिंग म्हणाला, उमरानला त्याच्या वेगवान चेंडूच्याबरोबरच त्याच्या कौशल्यावरपण लक्ष्य द्यायला हवे. तरच तो त्याची कारकिर्द मोठी करू शकेल. क्रिकबझशी बोलताना तो म्हणाला, ‘आत्ता उमरान मोठ्या स्तरावर खेळत नाहीये. तो याची तयारी करत आहे. मला वाटते की तो अजून पूर्ण तयार नाही. पॉवरप्लेमध्ये त्याचा उपयोग करण्यात आला, ज्याठिकाणी खूप धावा बनल्या आणि स्लॉगच्या षटकांत पण फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध जास्त धावा केल्या. वेगच सर्वकाही नाही. वेगवान गोलंदाजी करणे चांगली गोष्ट आहे, पण त्याबरोबरच आपल्याला कौशल्याचीही गरज असते.’
आरपी सिंग पुढे म्हणाला, वेगवान गोलंदाजाला विचार करावा लागतो, कोणत्या फलंदाजाला कुठे गोलंदाजी करायची हे तुम्हाला माहित पाहिजे.
दरम्यान उमरानच्या आयपीएल २०२२ मधील कामगिरीचा विचार करायचा झाल्यास त्याने १० सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ताशी १५६.९ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘आम्ही चुका केल्या, ज्याचे परिणाम भोगावे लागले’, पराभवानंतर हार्दिक पंड्याने सांगितली कुठे झाली चूक