न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना बे ओव्हल, माऊंट माऊंगनुई येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघ न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. विशेष म्हणजे, फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना इंग्लंडच्या दिग्गज गोलंदाजांनी अक्षरश: घाम फोडला आहे. ते गोलंदाज इतर कुणी नसून स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एँडरसन आहेत. या दोघांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील 23व्या षटकापर्यंत स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि जेम्स एँडरसन (James Anderson) यांनी दोन्ही डावात मिळून अनुक्रमे 5 आणि 3 विकेट्स घेतल्या. यासह त्यांनी खास विक्रम रचला. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एँडरसन (Stuart Broad And James Anderson) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 1000 विकेट्सचा टप्पा पार करणारी दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी जोडी बनली आहे.
Then ⏩ Now@Jimmy9 & @StuartBroad8 took their first Test wickets together in New Zealand in 2008
15 years later they are the most successful bowling partnership in Test history 🐐🐐#NZvENG pic.twitter.com/YHcoQqVDdP
— England Cricket (@englandcricket) February 18, 2023
मोडला मॅकग्रा-वॉर्नचा रेकॉर्ड
इतकेच नाही, तर ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) आणि दिवंगत महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) यांचा विक्रम मोडीत काढला आहे. मॅकग्रा आणि वॉर्न यांनी मिळून एकूण 1001 कसोटी विकेट्स घेतल्या होत्या. अशात आता ब्रॉड आणि एँडरसन यांनी आतापर्यंत 133 कसोटी सामने खेळताना मिळून 1005 विकेट्स घेतल्या आहेत.
The most successful bowling pair in Test history! 👑#NZvENG pic.twitter.com/Bo8OGoXw9o
— England Cricket (@englandcricket) February 18, 2023
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाच्या 23व्या षटकाच्या खेळापर्यंत एकत्र कसोटी सामने खेळताना ब्रॉडने कारकीर्दीत आतापर्यंत 480 आणि एँडरसन याने 525 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त वैयक्तिक कसोटी विकेट्सबद्दल बोलायचं झालं, तर एँडरसनने 678 आणि ब्रॉडने 571 विकेट्स घेतल्या आहेत.
या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि चमिंडा वास यांनी कसोटीत एकूण 895 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, वेस्ट इंडिजचा दिग्गज गोलंदाज कर्टली एंब्रॉस आणि कर्टनी वॉल्श यांनी मिळून 792 विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त पाकिस्तानचे माजी दिग्गज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी मिळून एकूण 559 विकेट्स घेण्याची कमाल केली होती. (pacer james anderson stuart broad pair become the most successful bowling pair in test cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा नंबर 18! WPL च्या पहिल्या हंगामात स्मृती करणार आरसीबीचे नेतृत्व, विराटने केली घोषणा
मैदान भारताचं, पण हवा लायनची! कसोटीत ‘बाप’ कामगिरी करणारा नेथन दुसराच, पहिल्या स्थानी ‘हा’ भारतीय