भारताचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलै या तारखेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ आपसात सामने खेळून सराव करत आहे. यादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली याची बॅट शांत असल्याचे पाहायला मिळाले. खरं तर, हा वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघाचा पहिला प्रतिस्पर्धी सामना होता. बुधवारी (दि. 05 जुलै) संघाच्या खेळाडूंनी आपसातच सामना खेळला.
या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू खेळताना दिसला. त्यामुळे त्याला विकेट गमावण्याची नामुष्कीही ओढावली. या सामन्यात तो काही खास कामगिरी करू शकला नाही. डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंगाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याने सुरुवातीला ओव्हर द विकेट चेंडू फेकले. त्यानंतर तो राऊंड द विकेट आला आणि ऑफ स्टम्पच्या बाहेर एक गुड लेंथ चेंडू टाकला. विराटने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कड घेत चेंडू मागे जाताच स्लीपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने सहजरीत्या झेल टिपला.
Virat kohli is dismissed to unadkat in the practice match. pic.twitter.com/GNGKzrRpyd
— MOHIT SHUKLA (@MohitShukla1030) July 5, 2023
मागील काही काळापासून विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्मचा सामना करत आहे. मागील तीन वर्षात विराटने 23 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने 31.76च्या सरासरीने 1239 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 अर्धशतकांचाही समावेश आहे. तसेच, 1 शतकही सामील आहे. हे शतकदेखील त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध यावर्षी खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेच्या अखेरच्या सामन्यात झळकावले होते.
विराट मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्या जुन्या फॉर्ममध्ये आल्याचे दिसत आहे. मात्र, कसोटीत विराट अजूनही फॉर्ममध्ये आला नाहीये. अशात जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 सायकलच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यात विराट धमाकेदार प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. (pacer jaydev unadkat dimissed virat kohli in practice match see video)
महत्वाच्या बातम्या-
शानदार प्रदर्शन करूनही स्टार क्रिकेटरचा टीम इंडियातून पत्ता कट, माजी प्रशिक्षकापुढेच आलं डोळ्यात पाणी
वर्ल्डकपच्या तीन महिने आधीच पाकिस्तानचे प्रशिक्षक बॅकफूटवर! म्हणाले, “भारताविरुद्धचा सामना म्हणजे…”