भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीतून मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीने क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. उभय संघातील दुसऱ्या कसोटीपूर्वीच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला संघातून बाहेर केले आहे. निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवडलेल्या पहिल्या दोन कसोटीसाठीच्या संघात त्याला स्थान दिले होते. बीसीसीआयने अधिकृत निवेदन जारी करत सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेच्या दुसऱ्या सामन्यापूर्वीच बीसीसीआयने जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या संघात त्याच्या नावाचा समावेश होता. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा पक्की नव्हती. कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या संमतीनंतर जयदेवला रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेचा अंतिम सामना सौराष्ट्र संघाकडून खेळण्यासाठी त्याला मुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
NEWS – Jaydev Unadkat released from India’s squad for 2nd Test to take part in the finals of the Ranji Trophy.
More details here – https://t.co/pndC6zTeKC #TeamIndia pic.twitter.com/8yPcvi1PQl
— BCCI (@BCCI) February 12, 2023
सौराष्ट्र संघाचा कर्णधार असलेल्या जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात जागा मिळाल्यानंतर रणजी संघाची साथ सोडली होती. मात्र, आता त्याचा संघ रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. 16 फेब्रुवारीपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर बंगाल विरुद्ध सौराष्ट्र संघात अंतिम सामना खेळला जाणार आहे.
भारताची मालिकेत विजयी आघाडी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जात असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि 132 धावांनी दमदार विजय मिळवला. यासोबतच मालिकेत 1-0ने आघाडीदेखील घेतली. आता शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, मागील 36 वर्षात भारताने दिल्ली येथे एकही कसोटी सामना गमावला नाहीये. त्यामुळे पुढील कसोटीत भारताला हा विक्रम कायम ठेवावा लागणार आहे. (pacer jaydev unadkat released from border gavaskar trophy india squad for 2nd test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रेम हे! पंतच्या लेटेस्ट फोटोवर गर्लफ्रेंड ईशा नेगीने ओवाळून टाकला जीव, पाहा मन जिंकणारी कमेंट
अभिमानास्पद! ‘ही’ महिला बनली टी20 विश्वचषकात मैदानावर पंचगिरी करणारी पहिलीच भारतीय; जाणून घ्याच