---Advertisement---

‘गोलंदाजाला कुणी बोललं तर राग…’, फिल सॉल्टशी झालेल्या बाचाबाचीवर सिराजचा मोठा खुलासा

On: मंगळवार, मे 9, 2023 5:02 PM
Mohammed-Siraj
---Advertisement---

आयपीएल 2023च्या 50व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यात दिल्लीने 16.4 षटकात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. सामना विजयापेक्षा सर्वाधिक चर्चा सामन्यातील एका वादग्रस्त किस्स्याची झाली. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फिल सॉल्ट यांच्यात सामनादरम्यान वातावरण तापल्याचे दिसले होते. सिराजच्या रागाविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच, सिराजवर टीकाही केली जात आहे. अशात सिराजने सॉल्टसोबत झालेल्या बाचाबाचीविषयी मत मांडले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) म्हणाला की, “जर कोणताही फलंदाज गोलंदाजाला बोलतो, तेव्हा राग येतो. परिस्थिती जशी बनते, त्यावेळी मी तशीच प्रतिक्रिया देतो.”

व्हिडिओत सिराजची वक्तव्य
आरसीबीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सिराज म्हणाला की, “गोलंदाजाला कोणी बोलले, तर राग येतो, पण त्याने चांगली फलंदाजी केली. मैदानावर जे घडते, ते मी तिथेच सोडून येतो. त्यामुळेच सामना संपल्यानंतर मी त्याची गळाभेट घेतली होती.”

आरसीबीचा पुढील सामना मुंबईविरुद्ध
खरं तर, आयपीएलच्या 50व्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 181 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, दिल्लीच्या फलंदाजांच्या वादळी खेळीमुळे दिल्लीने हा सामना 16.4 षटकातच 3 विकेट्स गमावत 187 धावा करून जिंकला. आता आरसीबीचा पुढील सामना मंगळवारी (दि. 9 मे) मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. जिंकणाऱ्या संघाला गुणतालिकेत फायदा होईल. यावेळी आरसीबी संघ 6व्या, तर मुंबई 8व्या स्थानावर आहे. आरसीबी आणि मुंबईमधील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. अशात उभय संघांपैकी कोणता संघ हा सामना जिंकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (pacer mohammed siraj on phil salt says a bowler will get angry if somebody tells him off ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या IPL निवृत्तीबाबत सुरेश रैनाचा खळबळजनक गौप्यस्फोट; वाचून CSK फॅन्सही होतील खूपच खुश
सुपरफ्लॉप ठरत असलेल्या रोहितविषयी सेहवागची बेधडक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तो गोलंदाजांमुळे नाही, तर…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---