टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत बुधवारी (दि. 09 नोव्हेंबर) सिडनी येथे पहिला उपांत्य सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. यामध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडला 7 विकेट्सने पराभूत केले. या विजयासोबत पाकिस्तान संघ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला. सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांकडून शानदार प्रदर्शन पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सामना जिंकल्यानंतर तो खूपच उत्साही दिसला. तसेच, आपला आनंद व्यक्त करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. त्याचा एक व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. यामध्ये दिसते की, शाहीन आफ्रिदीने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला उचलले.
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी न्यूझीलंडने केन विलियम्सन (46) आणि डॅरिल मिचेल (नाबाद 53) यांच्या शानदार खेळींमुळे 4 विकेट्स गमावत 152 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 19.1 षटकात 3 विकेट्स गमावत 153 धावा करत आव्हान पूर्ण केले. तसेच, अंतिम सामन्यात धडक दिली.
पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाजांनी केलेल्या प्रदर्शनामुळे न्यूझीलंड संघाला समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. संघाचा मुख्य गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने 4 षटके गोलंदाजी करत 24 धावा देत सर्वाधिक 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यावेळी विजय मिळवल्यानंतर आफ्रिदी भलताच खुश दिसला. त्याने मैदानावर जाऊन कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना उचलून घेतले, जे आधीच एकमेकांना मिठी मारत विजयाच्या शुभेच्छा देत होते.
आयसीसीने आफ्रिदीचा यादरम्यानचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत आयसीसीने कॅप्शनही दिले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आफ्रिदी आपला आनंद रोखू शकला नाही.”
https://www.instagram.com/reel/CkvSgGuskEG/?utm_source=ig_embed&ig_rid=7b2ba804-f7eb-4a41-9a91-f3dcf5b5ddaf
येत्या 13 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळेल पाकिस्तान
विशेष म्हणजे, पाकिस्तान संघ टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड संघात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात जो संघ विजेता बनेल, तो 13 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न येथे अंतिम सामना खेळेल. (Pacer Shaheen Shah Afridi lifts Babar Azam and Mohammad Rizwan together after Pakistan Win in 1st Semi Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही मेलबर्नमध्ये तुमची वाट बघतोय’; टीम इंडियाला पाकिस्तानी दिग्गजाचे ओपन चॅलेंज
बाबर अन् रिझवानने भल्याभल्यांना दाखवली आपली ताकद, टी20 विश्वचषकाच्या ‘या’ विक्रमात बनलेत टेबल टॉपर