येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या विश्वचषकापूर्वी सराव सामन्यांनाही सुरुवात झाली आहे. अशातच पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने वनडे विश्वचषक 2019 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्याविषयी मोठे विधान केले आहे. या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले नव्हते. त्यामुळे शाहीन खूपच निराश झाला होता.
काय म्हणाला शाहीन?
आघाडीच्या क्रिकेट वेबसाईटशी बोलताना शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) म्हणाला, “मला भारताविरुद्धचा 2019 विश्वचषक स्पर्धेतील सामना आठवतो, ज्यात मला निवडले गेले नव्हते. मी सामन्याच्या एक दिवसाआधी ताफ्यात होतो. मात्र, जेव्हा नाणेफेक झाली, तेव्हा मला अचानक प्लेइंग 11मधून बाहेर केले गेले. संघाचा हा निर्णय आणि त्यासोबत गेले, जो त्यावेळी योग्य पर्याय होता. मात्र, तो सामना न खेळल्यामुळे मी खूपच निराश झालो होतो.”
पुढे बोलताना शाहीन म्हणाला, “मला वाटले होते की, मी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली आहे आणि मी सामना खेळण्यासाठी योग्य मार्गावर आहे. मात्र, मी या सामन्याला मुकलो. मला खूप राग आला होता, पण तुम्हाला हे समजले पाहिजे की, काही निर्णय संघ लक्षात घेऊन घ्यावे लागतात. कारण, हा वैयक्तिक खेळ नाहीये. आम्ही भारताविरुद्ध तो सामना पराभूत झालो, ज्याप्रकारे जे निकाल आले, त्यामुळे आमच्या क्वालिफायच्या अपेक्षा अखेरपर्यंत कायम राहिल्या.”
वनडे विश्वचषक 2019 स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्याची आठवण सांगत शाहीन म्हणाला, “जेव्हा आम्ही बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी उतरलो, तेव्हा त्यावेळी स्पर्धेतून प्रभावीपणे बाहेर झालो होतो. मात्र, जेव्हा तुम्ही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत असता, तेव्हा कोणताही सामना पहिला असो किंवा अखेरचा, मोठा संघ असो वा छोटा, हा अशाप्रकारे खेळला गेला पाहिजे, जसा हा अंतिम सामना आहे. माझी इच्छा होती की, लोकांनी मला पाहावे आणि विचार करावा की, मी अभिमानाने खेळलो आणि कधीच मागे हटलो नाही. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा होता.”
शाहीन आफ्रिदी खेळणार विश्वचषक 2023
शाहीन आफ्रिदी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघाचा महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. कारण, नसीम शाह दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. अशात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजी विभागाची जबाबदारीही आफ्रिदीवर असणार आहे. पाकिस्तान संघाचा विश्वचषकातील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँडविरुद्ध हैदराबाद येथे खेळला जाणार आहे. (pacer shaheen shah afridi recalls deep disappointment at missing 2019 world cup game against india)
हेही वाचा-
कधी, कुठे आणि कसा पाहता येईल IND vs ENG संघातील सामना? एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती
वेलकम बॅक कॅप्टन! वर्ल्डकपआधी सराव सामन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्सने विजय