काही क्रिकेटपटू असे असतात, जे असा काही विक्रम करतात, जो त्यांच्यापूर्वी कुठल्याच खेळाडूला जमलेला नसतो. अशाच विक्रम ट्रेंट बोल्ट याच्या नावावर झाला आहे. ट्रेंट बोल्ट हा विश्वचषक इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज बनला आहे. त्याने हा विक्रम गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात सुरू असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 41व्या सामन्यात केला. त्याने भल्याभल्या दिग्गजांना मागे टाकले आहे.
ट्रेंट बोल्टचा विक्रम
ट्रेंट बोल्ट (Trent Boult ) याने या श्रीलंकेच्या डावातील पाचव्या षटकात 2 विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या चेंडूवर कर्णधार कुसल मेंडिस याला 6 धावांवर रचिन रवींद्रच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा यालाही 1 धावेवर खेळत असतानाच डॅरिल मिचेल याच्या हातून झेलबाद केले. यातील पहिली विकेट घेताच त्याच्या नावावर वनडे विश्वचषक इतिहासातील 50 विकेट्सची नोंद झाली. बोल्ट विश्वचषकात 50 विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला.
Trent Boult becomes the first New Zealand player to 50 wickets in World Cup.
Most wickets
52 – Trent Boult
38 – Tim Southee
36 – Jacob Oram
36 – Daniel Vettori
32 – Chris Harris#CWC2023 #NZvSL pic.twitter.com/PSfsU2Lb1k— Kausthub Gudipati (@kaustats) November 9, 2023
न्यूझीलंडकडून विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी टीम साऊदी आहे. त्याने 38 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या जेकब ओरम आणि डॅनियल विटोरी असून दोघांनीही प्रत्येकी 36 विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी ख्रिस हॅरिस असून त्यांनी 32 विकेट्स घेतल्या होत्या.
बोल्टची सामन्यातील कामगिरी
बोल्ट याने 21व्या षटकांचा खेळ होईपर्यंत 6 षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 30 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या आहेत. बोल्टने तिसरी विकेट नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चरिथ असलंका याच्या रूपात घेतली. त्याने असलंकाला 8 धावांवर पायचीत बाद केले. त्यामुळे विश्वचषकात त्याच्या एकूण 52 विकेट्स झाल्या आहेत. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (pacer Trent Boult becomes the first New Zealand player to 50 wickets in World Cup see list)
विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
52 – ट्रेंट बोल्ट*
38 – टीम साऊदी
36 – जेकब ओरम
36 – डॅनियल विटोरी
32 – ख्रिस हॅरिस
हेही वाचा-
पीसीबीकडून इंझमाम उल हकचा राजीनामा मंजुर, लावले होते ‘हे’ मोठे आरोप
पहिल्या 5 ओव्हरमध्येच श्रीलंकेला धक्क्यावर धक्के! बोल्टने एकाच ओव्हरमध्ये घेतले 2 बळी






