---Advertisement---

‘फक्त हे काम कर, मग जगावर राज्य करशील’, अनुभवी शमीचा ‘वेगाच्या बादशाह’ला मोलाचा सल्ला

On: रविवार, जानेवारी 22, 2023 11:39 AM
Mohammed-Shami-And-Umran-Malik
---Advertisement---

भारतीय संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील पहिले दोन्ही सामने भारताने खिशात घातले आहेत. दुसऱ्या वनडेत भारताने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. तसेच, मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात गोलंदाज आणि फलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. मोहम्मद शमी याने सामन्यात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सामन्यानंतर वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने मोहम्मद शमी याची मुलाखत घेतली. यादरम्यान त्याने उमरानला खास सल्ला दिला.

उमरानचा शमीला प्रश्न
सामन्यानंतर उमरान मलिक (Umran Malik) याने मोहम्मद शमी (Mohammed Shami) याची मुलाखत घेतली. उमरान म्हणाला की, “शमी तू माझा आवडता आहेस. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की, तुम्ही सामन्यादरम्यान इतके खुश कसे राहता?” यावर शमी म्हणाला की, “तुम्ही जेव्हा भारतासाठी खेळत असता, तेव्हा तुम्हाला सर्वकाही विसरून जायचे असते. तुम्हाला तुमच्या कौशल्य आणि प्रतिभेवर विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही इकडच्या- तिकडच्या गोष्टींचा विचार केला, तर त्याचा तुमच्या गोलंदाजीवर मोठा परिणाम होईल. तुम्हाला तुमच्या प्रतिभेवर विश्वास ठेवावा लागेल. सामन्यादरम्यान तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवला, तरच तुम्ही चांगली कामगिरी कराल.”

मोहम्मद शमीचा उमरान मलिकला सल्ला
शमीने उमरानला त्याच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्याने सल्ला देत म्हटले की, “येणाऱ्या काळात तू खूप नाव कमावणार आहेस. मला फक्त तुला एक सल्ला द्यावा वाटतो की, तुझ्याकडे जी गती आहे, वाटत नाही, त्या गतीवर खेळणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे आहे. फक्त थोडी लाईन आणि लेंथवर काम करण्याची गरज आहे. जर आपण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो, तर आपण जगावर राज्य करू.”

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आतापर्यंत दोन वनडे सामने खेळले गेले आहेत. मात्र, यातील एकाही सामन्यात उमरान मलिक याला संधी देण्यात आली नाहीये. असे असले, तरीही श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत उमरानने त्याच्या गोलंदाजीचा दम दाखवला होता. उमरान वनडेत भारताकडून सर्वात वेगाने चेंडू फेकणारा गोलंदाज बनला होता. मालिकेच्या तिसऱ्या वनडेत उमरानला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाते की, हे पाहावे लागेल. मालिकेतील अखेरचा वनडे सामना मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे पार पडणार आहे. (pacer umran malik interview mohammed shami video after 2nd odi vs new zealand)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बेबी एबी’साठी मुंबई इंडियन्सचे ‘हे’ खेळाडू आहेत आदर्श; एक रोहित, तर दुसरा कोण?
ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटी! कसोटी मालिकेपूर्वी बुमराहचा गोलंदाजी सराव, व्हिडिओ जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---