पुणे | जागतिक क्रमवारीत ४१व्या स्थानावर असलेला बेनॉइट पायरे हा ३० व ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. फ्रान्सच्या पायरेसह जागतिक क्र. १६४ क्रमांकावर असेलला स्पेनचा टॉमी रोबरेडो हासुद्धा मुख्य स्पर्धेसाठीच्या चार स्थानांकरिता झुंज देणार आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आणि आयएमजी रिलायंसच्या पाठिंब्याने एटीपी २५० वर्ल्ड टूर सिरीजमधील हि स्पर्धेचे बालेवाडी येथे दि. १ ते ६ जानेवारी २०१८ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
एटीपी कमबॅक प्लेअर ऑफ द इयर बेनॉइट पायरे भारतात पार पडलेल्या पाच स्पर्धा खेळल्या आहेत. तसेच, याआधी त्याने २०१७, २०१६ व २०१२ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. स्पेनचा टॉमी रोबरेडो हा तब्बल चौदा वर्षांनी भारतात येत आहे. त्याला २००४मध्ये उपांत्य फेरीत पॅराडॉर्ण श्रीचफनकडून पराभव पत्करावा लागला होता आणि २००२मध्ये रशियाच्या आंद्रे स्टोलिऍरोव्हकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
पायरे याने यावर्षी माद्रिद येथील एटीपी मास्टर्स १००० स्पर्धेत दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत ३ऱ्या स्थानावर असलेल्या स्टॅनिस्लास वावरिंकाला पराभूत करून कारकिर्दितीतील सर्वोत्तम विजय मिळविला आहे. मात्र, वावरिंकाच्या साथीत पायरे याने २०१३मध्ये चेन्नई ओपन स्पर्धेत दुहेरी गटाचे विजेतेपद संपादन केले होते. पण २०१६मध्ये ऑस्टिन क्रायचेकच्या साथीत पायरेला याची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले.
तसेच, गतवर्षी स्पेनचा टॉमी रोबरेडोला दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकल्यानानंतर यंदा पात्रता फेरितून मुख्य फेरीत प्रवेश मिळवावा लागणार आहे. रोबरेडोने २००४मध्ये चेन्नई ओपन मध्ये राफेल नदालच्या साथीत दुहेरीत विजेतेपद पटकावले होते. २००८मध्ये मोनॅको येथील एटीपी मास्टर्स १०००स्पर्धेत दुहेरीत मार्क क्नोवलेस व महेश भूपती या जोड़ीचा पराभव करून रोबरेडोने विजेतेपद संपादन केले होते.
तसेच या स्पर्धेच्या आव्हानवीरांमध्ये जागतिक क्रमवारीत ११०व्या स्थानावर असलेला मार्को चेचीनाटो सहभागी होतअसून गतवर्षी मार्को चेचीनाटोला भारताच्या युकी भांब्रीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. याशिवाय जागतिक क्र. १२७ ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास, जागतिक क्र. १८६ कार्लोस टेबर्नर आणि जागतिक क्र. १९९ रिकार्डो ओझेदा लारा हे रोबरेडो या तीन स्पॅनिश खेळाडूंचा रोबरेडोसह पात्रता फेरीत समावेश आहे.
ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास हा याआधी नोव्हेंबर मध्ये पार पडलेल्या केपीआयटी एमएसएलटी चॅलेंजर स्पर्धा खेळला असून तो दुसऱ्यांदा पुण्यात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होत आहे. तो याआधी एकेरीत उपांत्य फेरीत युकी भांब्रीकडून पराभव पत्करावा लागला होता. २०१५मध्ये मॅसिरास याने केपीआयटी एमएसएलटी चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत विजेतेपद संपादन केले होते.
याशिवाय परदेशी खेळाडूंमध्ये जागतिक क्रमवारीत ११८व्या स्थानावर असलेला बेल्जीयमचा रूबेन बेमेलमन्स, १२४व्या क्रमांकाचा ब्राझीलचा थियागो मोंटेरिओ, १४९व्या क्रमांकाचा बल्जेरियाचा इगोर जेरासिमोव आणि भारताच्या सुमित नागल व प्रजनेश गून्नेश्वरन यांचा समावेश आहे.
नोव्हेंबर मध्ये पार पडलेल्या एटीपी बेंगलुरू ओपन स्पर्धेत 20 वर्षीय नागलने ब्रिटेनच्या जे क्लार्क याचा 6-3, 3-6, 6-2 असा तीन सेट मध्ये पराभव करत आपल्या कारकिर्दीताल पहिला चॅलेंजर किताब जिंकला.
स्पर्धेदरम्यान नागलने भारतातील अव्वल खेळाडू युकी भांब्री तसेच स्लोव्हेनियाचा कावकीक ब्लाज यांसारख्या अव्वल खेळाडूंचा पराभव केला.याशिवाय गुन्नेस्वरन चीन एफ 10 कुन्शान, भारत एफ 6 त्रिवेंद्रम आणि भारत एफ 4 भिलाई येथील आयटीएफ स्पर्धा विजयानंतर चौथ्यांदा या स्पर्धेची पात्रता फेरी खेळणार आहे. यापुर्विचे तीन प्रयत्न अपयशी ठरल्या नंतर चेन्नईचा हा डावखुरा खेळाडू मुख्य फेरीमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करेल.
यावेळी स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले कि, बेनॉइट पायरे, रोबरेडोसारख्या दर्जेदार खेळाडूंचा पात्रता फेरीत समावेश असल्यामुळे यंदाच्या स्पर्धेच्या रोमांचकतेत भर पडणार आहे.सुमित नागल व प्रजनेश गून्नेश्वरन यामुळे भारताचे प्रतिनिधत्वही चांगल्या खेळाडूंच्या हाती आहे आणि या दोघांनीही नजीकच्या भूतकाळात चांगली कामगिरी केली आहे.