भारत पाकिस्तान यांच्यातील वाद जगजाहीर आहे. दोन्ही संघात आयसीसीच्या चषकातील सामन्यांना सोडुन कोणतेही सामने खेळले जात नाहीत. भारत आणि पाकिस्तान संघात गेल्या दशकापासून कोणत्याही प्रकारची मालिका खेळवल्या गेलेली नाही. दोन्ही देशांच्या सीमेवरील तणावांना बघता ते शक्य झालेले नाही. दोन्ही देशांतुन अधुनमधुन ऐकायला मिळते की दोन्ही देशांमध्ये द्वीपक्षीय मालिका खेळल्या जाऊ शकते मात्र अद्दाप असे काहीच घडलेले नाही. अशावेळी ४ वर्षानंतर परतत असणाऱ्या आशिया कपमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. त्याबाबतीत बोलताना पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लातिफ यांनी आपले मत मांडत पाकिस्तान संघ आशिया कप जिंकु शकतो अशी आशा दर्शवली आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राशिद लातिफ म्हणाले की,’भारतीय क्रिकेट संघ नक्कीच खुप बलाढ्य आहे यात काही शंका नाही. पण सध्याला ज्याप्रकारे पाकिस्तानचा संघ खेळत आहे असा खेळ मी काही वर्ष झाले पाकिस्तान क्रिकेट संघाकडुन पाहिला नाहीये. पाकिस्तानकडे बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहिन आफ्रिदी यांसारखे खेळाडू आपल्या दिवशी एकट्याच्या बळावर सामना जिंकवु शकतात. ज्यांना आयसीसीने सध्याचे सर्वोत्म खेळाडू म्हणुनही निवडले आहे.’
राशिद लातिफ पुढे म्हणाले की,’ मी आशा करतो की, पाकिस्तान यावेळी आशिया चषक जिंकेल. टी२० विश्वचषकातील भारता विरुद्धच्या विजयाने तर अपेक्षा अजुनही उंचावल्या आहेत. बाकी संघदेखील आपला हा चषक जिंकण्यासाठी आपला पुर्ण जोर लावतील हे नक्की. मात्र हे ही तेवढेच खरे आहे की, भारत आणि पाकिस्तान हा सामना चुरशीचा आणि महत्वाचा ठरेल.’
आशिया चषक हा ऑस्ट्रेतियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या आधीच खेळला जाईल. हा आशिया चषक टी२० विश्वचषकाची पुर्वतयारी म्हणुन २० षटकांचाच खेळला जाईल. टी२० मध्ये दोन्ही संघांचा हात भारी आहे. दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या ९ सामन्यात ७ सामने भारत तर २ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. २०१६ साली टी२० रुपात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ गडी राखुन हरवले होते. आतापर्यंत आशिया चषकात खेळल्या गेलेल्या सामन्यातही भारताची सरशी आहे. आतापर्यंत आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या १४ सामन्यात भारताने ८ तर पाकिस्तानने ५ सामने जिंकले आहेत तर १ सामना १९८७ साली पाऊसामुळे रद्द झाला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयर्लंड की इंग्लंड? ‘दादां’चे ठरलंय कोणता सामना पाहायला जायचं ते
आमंत्रण असूनही रमिझ राजा याने आयपीएल फायनल साठी उपस्थित राहणे टाळले?, कारण झाले स्पष्ट